अ‍ॅपशहर

रॅपिड टेस्टिंग थांबवा, राज्यांना आयसीएमआरची सूचना

एका राज्याकडून रॅपिड टेस्टिंग किट बाबत तक्रारी येत होत्या. यानंतर आम्ही आणखी तीन राज्यांकडून माहिती घेतली. पॉझिटिव्ह असलेल्या नमुन्यांमध्ये मोठी तफावत दिसून येत होती. यामुळे आम्ही याकडे दुर्लक्ष न करता या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमच्या संस्थेच्या ८ केंद्रांमधील प्रतिनिधींना रॅपिड टेस्ट किटची प्रत्यक्ष तापसणी करण्यासाठी पाठवणार आहोत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2020, 5:43 pm
नवी दिल्लीः राज्यांना देण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचा उपयोग रोखण्याची सूचना आयसीएमआरने केली आहे. काही राज्यांमध्ये हे टेस्टिंग किट फोल ठरत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांनंतर या संदर्भात नव्याने दिशानिर्देश जारी करण्यात येतील, अशी माहिती आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. महाराष्ट्रात आरोग्य विभागाकडून हॉटस्पॉट भागांमध्ये ७५ हजारांवर अधिक रॅपिड टेस्ट करण्यात येणार होत्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम R-Gangakhedkar


एका राज्याकडून रॅपिड टेस्टिंग किट बाबत तक्रारी येत होत्या. यानंतर आम्ही आणखी तीन राज्यांकडून माहिती घेतली. पॉझिटिव्ह असलेल्या नमुन्यांमध्ये मोठी तफावत दिसून येत होती. यामुळे आम्ही याकडे दुर्लक्ष न करता या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमच्या संस्थेच्या ८ केंद्रांमधील प्रतिनिधींना रॅपिड टेस्ट किटची प्रत्यक्ष तापसणी करण्यासाठी पाठवणार आहोत. यातून त्या किट्स पडताळणी केली जाईल. ते योग्य प्रकारे काम करत आहेत की नाही हे बघितले जाईल. कारण हे लॅबमध्ये बघता येणार नाही. तसंच पुढचे दोन दिवस कुठल्याही राज्यांनी रॅपिड टेस्टिंग किटचा उपयोग करू नये. तपासणीत रॅपिड टेस्टिंग किट्स फक्त काही बॅचेस सदोष आढळून आली तर ती संबंधित कंपनीकडून बदलून घेतली जातील. दोन दिवसांत आमच्या तपासणी जे काही आढळून येईल याची माहिती दिली जाईल आणि त्यासंबंधी नव्याने दिशानिर्देश दिले जातील, असं डॉ. रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केलं.

करोनाचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी आयसीएमआकडून विविध राज्यांना ५ लाखांहून रॅपिड टेस्टिंग किट देण्यात आले. हे रॅपिड टेस्टिंग किट भारताने चीनमधून आयत केले आहेत. भारतात १५ एप्रिलला ते दाखल झाले. यानंतर आयसीएमआरकडून ते विविध राज्यांना पाठवण्यात आले. हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये या रॅपिड टेस्टिंग किटचा उपयोग करण्यात येत होता . राजस्थानमध्ये रॅपिड टेस्टिंग किट फोल ठरत असल्याच्या तक्रारी आयसीएमआरकडे आल्या होत्या.

बंगाल सरकार सहकार्य करत नाही: केंद्रीय पथकांची तक्रार

गुडन्यूज : एकाच दिवशी ७०५ रुग्णांनी केली करोनावर ...

देशातील रुग्ण वाढ सध्या नियंत्रणात

करोना हा नवीन आजार आहे. गेल्या साडे तीन महिन्यांत जे काही संशोधन होतंय जशी माहिती मिळत आहेत त्यानुसार आपण काम करत आहोत. करोनासंदर्भात जगात अतिशय वेगाने संशोधन सुरू आहे. आतापर्यंत ५ लसींना मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसंच लॉकडाऊनचे दोन फायदे आहेत. पहिला म्हणजे आरोग्य यंत्रणांना तयारी करण्यासाठी वेळ मिळत आहे. दुसरा म्हणजे रुग्ण वाढ जेवढी लांबणीवर जाईल तेवढ्या वेळात लस किंवा त्यावरील औषध आल्यास आपल्याला मदत होईल. यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही, असं गंगाखेडकर यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज