अ‍ॅपशहर

'भारतीय पद्धत अवलंबवा अन् करोनापासून वाचा'

करोना हा साथीचा रोग असल्याने इतरांच्या संपर्कात येताच दुसऱ्यालाही लागण होते. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी आपल्या देशातील जनतेला भारतीय पद्धव अवलंबण्याची सूचना केलीय. एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धत म्हणजे 'नमस्ते' करा, असं नेतान्याहू म्हणाले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेतान्याहू यांनी एक आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी उपाययोजनांची माहिती दिली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Mar 2020, 6:01 am
नवी दिल्लीः करोना हा साथीचा रोग असल्याने इतरांच्या संपर्कात येताच दुसऱ्यालाही लागण होते. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आपल्या देशातील जनतेला भारतीय पद्धव अवलंबण्याची सूचना केलीय. एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धत म्हणजे 'नमस्ते' करा, असं नेतान्याहू म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम netanyahu-israel-namaste


करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेतान्याहू यांनी एक आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी उपाययोजनांची माहिती देण्यापूर्वी नागरिकांना एक आवाहन केलं. 'काही सोप्या गोष्टी आहेत. ज्या केल्यावर करोनाचा संसर्ग होण्यापासून नागरिक वाचू शकतात,असं ते म्हणाले. नेतान्याहू यांनी पत्रकार परिषदेत दोन्ही हात जोडले आणि 'नमस्ते' केलं. हस्तांदोलन करण्याऐवजी 'नमस्ते' करा, असं नेतान्याहू यावेळी म्हणाले.

करोना: 'ही' आहेत करोनाची लक्षणे...

करोना व्हायरस: 'ही' काळजी घ्या

इस्रायलने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष बनवले आहेत. तसंच विमान प्रवाशांबाबत काही निर्देशही देण्यात आलेत, असं त्यांनी सांगितलं. इस्रायलमध्ये आतार्यंत १५ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. पण करोनाने तिथे कुणाचा बळी गेलेला नाही.

'करोना'च्या तयारीवर स्वतः PM मोदींचे लक्ष

करोनासमोर मास्कचाही उपयोग शून्य; तज्ञांचं मत

करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तिपासून किमान दोन ते तीन फूट अंतर ठेवा. संसर्ग टाळण्यासाठी करोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या एकदम जवळ जाऊ नका. त्याच्याशी हात मिळवू नका. शक्य झाल्यास मास्कचा उपयोग करा. तसंच वेळो-वेळी आपले हात स्वच्छ धुवा, असं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं.

... म्हणून PM मोदी होळी खेळणार नाहीत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज