अ‍ॅपशहर

coronavirus : राजधानी दिल्लीत लॉकडाउन वाढवला, यूपीतही संचारबंदीत वाढ

करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिल्लीत लॉकाडउनमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. तर उत्तर प्रदेशात संचारबंदी वाढवण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 May 2021, 6:06 pm
नवी दिल्लीः देशाची राजधानी दिल्लीला काहिसा दिलासा देणारी बातमी आज आली आहे. दिल्लीत रविवारी करोनाने २७३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही २१ एप्रिलनंतरची सर्वात कमी संख्या आहे. तसंच १३,३३६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पण अजूनही पॉझिटिव्हिटी दर हा २१.६७ टक्क्यांवर आहे. १२ एप्रिलनंतर दिल्लीत सर्वात कमी नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी कमी प्रमाणात झालेली नमुन्यांची हे याचं कारण आहे, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम covid 19 india
राजधानी दिल्ली लॉकडाउन वाढवला, यूपीतही संचारबंदीत वाढ


करोनाचा वाढता रोखण्यासाठी तामिळनाडू, राजस्थान आणि केंद्र शासित प्रदेश पुदुच्चेरीने १० मेपासून संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली आहे. हा लॉकडाउन २४ मेपर्यंत लागू असणार आहे. कर्नाटकमध्ये शुक्रवारी संध्याकाळपासून आणि केरळमध्ये शनिवारी सकाळपासून लॉकडाउन सुरू झाला आहे. आता दिल्ली आणि यूपीतही लॉकडाउन वाढण्यात आला आहे.

दिल्लीत पुन्हा एक आठवड्यासाठी म्हणजे ७ दिवसांसाठी लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी याची घोषणा केली. लॉकडाउनमुळे दिल्लीत करोना संसर्ग कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये व्यापारी, महिला आणि इतरांसोबत आपली चर्चा झाली. त्यांनी करोनाचा संसर्ग कमी झाल्याचं सांगितलं. पण कडक निर्बंध कायम ठेवण्याचंही सुचवलं. यावेळी मेट्रोही बंद राहणार आहे. अपरिहार्यतेमुळे २० एप्रिलपासून लॉकडाउन घोषित करावा लागला होता. २६ एप्रिलला पॉझिटिव्हिटी दर ३५ टक्क्यांपर्यंत गेला होता. त्यानंतर रुग्ण कमी होऊ लागले. गेल्या दोन ते ३ दिवसांत पॉझिटिव्हिटी दर २३ टक्क्यांवर आला आहे. आपण साथ दिल्यानेत लॉकडाउनच्या काळात आरोग्य सुविधा वाढण्याचा प्रयत्न केला गेला, असं केजरीवाल यांनी सांगितलं.

rahul gandhi : 'देशाला श्वास हवा आहे, पंतप्रधानांचे नवे निवासस्थान नाही'

यूपीत १७ मेपर्यंत संचारबंदीत वाढ

उत्तर प्रदेशात करोना संसर्ग रोखण्यात लागू केलेली संचारबंदी १७ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. या काळात ईदचा सणही आहे. पण त्या दिवशीही सर्व निर्बंध लागू होतील. राज्यात दुसऱ्यांदा निर्बंध वाढण्यात आले आहेत.

subramanian swamy : 'PM मोदींनी गडकरींबाबतचा प्रस्ताव स्वीकारायला हवा होता', सुब्र

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज