अ‍ॅपशहर

...म्हणून त्यांनी मुलाचं नाव 'लॉकडाऊन' ठेवलं

करोना व्हायरसला देशातून हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी झटत आहेत. या करोनाविरोधातील लढाईत आम्ही सरकारसोबत आहोत. देशाच्या सुरक्षेसाठी मोदींनी जे अभियान सुरू केले आहे त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही आपल्या मुलाचं नाव लॉकडाऊन असं ठेवलं आहे, असं उत्तर प्रदेशातील देवरियामधली जोडप्यानं सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Apr 2020, 1:05 am
देवरिया, उत्तर प्रदेशः करोना व्हायरसा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या दरम्यान उत्तर प्रदेशातील देवरिया इथं एका जोडप्याला मुलगा झालाय. त्यांनी या मुलाचं 'लॉकडाऊन' ठेवलंय. या देशव्यापी लॉकडाऊन जन्म झाला म्हणून जोडप्याने मुलाचं नाव 'लॉकडाऊन' ठेवलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम New Born Baby Gets Name Lockdown


करोना व्हायरसला देशातून हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी झटत आहेत. या करोनाविरोधातील लढाईत आम्ही सरकारसोबत आहोत. देशाच्या सुरक्षेसाठी मोदींनी जे अभियान सुरू केले आहे त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही आपल्या मुलाचं नाव लॉकडाऊन असं ठेवलं आहे, असं या जोडप्यानं सांगितलं.

देवरियातील खुखुंदू गावांतील गावकरी पवनकुरा यांची पत्नी नीरजा गर्भवती होत्या. गावातील सामाजिक आरोग्य केंद्रा नीरजा यांनी २८ मार्चला मुलाला जन्म दिला. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. नागरिकही लॉकडाऊनचं पालन करत आहेत. अशा परिस्थितीत जोडप्यानं मुलाचं नाव लॉकडाऊन ठेवलंय.

निजामुद्दीनला गेलेले तामिळनाडूचे ४५ जण करोना पॉझिटिव्ह

निजामुद्दीनमधील ४४१ जणांमध्ये करोनाची लक्षणं

करोना: 'ते' मशिदीत लपले होते, पोलिसांचा छापा

आधी टिंगल, मग कौतुक

आम्ही मुलाचं नाव लॉकडाऊन ठेवल्यावर गावातील काही जण टिंगल उडवू लागले, चेष्ट सुरू लागले. पण नंतर लोकांनी कौतुक केलं, असं लॉकडाऊनची आई नीरजाने सांगितलं. करोनासारख्या महामारीविरोधातील लढाईवर पंतप्रधान मोदी स्वतः बारकाईने लक्ष देऊन आहेत. अशा परिस्थितीत जन्मलेला आमचा मुलगा मोदींच्या यशस्वी अभियानाचे प्रतिक आहे. हे अभियान यशस्वी करण्याचं आपल्या सर्वांचं उद्दिष्ट हवं, असं लॉकडाऊनचे वडील पवन कुमार म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज