अ‍ॅपशहर

holi celebration : महाराष्ट्रावर करोनाचे सावट, देशात इतर ठिकाणी होळीचा उत्साह

देशात एकीकडे करोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे काही ठिकाणी होळीचा उत्साह दिसून येतोय. खासकरून यूपी आणि मध्य प्रदेशात होळीचा आनंद लुटताना नागरिक दिसून येत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रावर करोनाचे सावट असल्याने राज्यात मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून नियमांचे कठोर पालन होत आहे. यामुळे होळीच्या आनंदावर करोनाने पाणी फेरले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2021, 2:03 pm
नवी दिल्लीः देशात सध्या करोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात रविवारी तर ४० हजारांवर नवीन रुग्ण आढळून आले. यामुळे महाराष्ट्रावर करोनाचे सावट आहे. यामुळे होळी आणि धुलिवंदनाच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. मात्र देशात इतर राज्यांमध्ये काही ठिकाणी उत्साहात होळी साजरी होताना ( holi celebration ) दिसतेय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Devotees play Holi at Banke Bihari Temple in Vrindavan
महाराष्ट्रात करोनाची धुळवड, देशात इतर ठिकाणी होळीचा उत्साह


समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी यूपीतील इटावामध्ये पक्ष कार्यकर्त्यांसोबत होळी साजरी केली. कुठल्याही रंगांचा वापर न करता फुलांनी ही होळी साजरी करण्यात आली.

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर अनोख्या प्रकारे होळी साजरी केली.

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये शिवभक्तांनी होळी साजरी केली. पारंपरिक गाण्यांवर नाचत होळीचा साजरी केली गेली.

जेव्हा वाजपेयींसोबत थिरकले होते मोदी, बघा होळीचा हा खास फोटो

होळीचा सर्वाधिक उत्साह आणि आनंद यूपीतील मथुरामध्ये बघायला मिळाला. वृंदावनमधील बाके बिहारी मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली. करोना संसर्गाचा धोका असतानाही शेकडोंच्या संख्येत भाविकांनी मंदिरात गर्दी करत होळीचा आनंद लुटला.


PM मोदींनी दिल्या होळीच्या शुभेच्छा; म्हणाले, 'आनंदाचा सण...'

पंजाबमध्ये अमृतसरमधील स्थानिकांनी होळी साजरी केली.

coronavirus india : करोनाची धुळवड! देशातील नवीन रुग्णांची संख्या ६८ हजारांवर

गोव्यात मिरामार बीचवर पर्यटकांची होळी...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज