अ‍ॅपशहर

२६३ भारतीयांना इटलीहून आणणाऱ्या कॅप्टन स्वाती यांचे होतेय कौतुक

कोविड-१९ या विषाणूने ज्या देशात हाहाकार माजवला आहे, त्या इटली या देशात अडकलेल्या २६३ भारतीयांना कमर्शियल पायलट स्वाती रावल या सुखरूपपणे मायदेशी घेऊन आल्या. त्यांच्या कामगिरीचे देशभर कौतुक होत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Mar 2020, 5:29 pm
अहमदाबाद: करोना विषाणू म्हणजेच कोविड-१९ च्या उद्रेकानंतर हाहाकार माजवलेल्या इटलीत अडकलेल्या २६३ भारतीयांना एअर इंडियाच्या कमर्शियल पायलट स्वाती रावल सुखरूप परत घेऊन आल्या. स्वाती यांची ही कामगिरी म्हणजे केवळ गुजरातच नाही संपूर्ण भारतासाठी एक अभिमानाचा क्षण होता. या भारतीयांच्या सुरक्षित परतण्याने केवळ शेकडो भारतीयांमध्ये विश्वासच दृढ झाला असे नाही, तर भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिशय जागरूक आहे असा संदेशही जगाला पोहोचला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम captain-swati-rawal


करोना: पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार

स्वाती यांच्या या कामगिरीबाबत स्वाती यांचे वडील एस. डी. रावल यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना माहिती दिली. स्वातीला २२ लोकांच्या पथकासह इटलीला जाण्याची सूचना मिळाली. त्यानंतर २१ मार्चला संध्याकाळी तिने मला फोन केला. मग तू काय निर्णय घेतला आहेस असे मी तिला विचारले असता, मी जायला तयार आहे, असे तिने मला सांगितले असे रावल म्हणाले.

परदेशातून परतलेत ४० लाख लोक: आरोग्यमंत्री

'मला माझ्या मुलीचा अभिमान आहे'

मी एक वन अधिकारी आहे. मी प्रत्येक परिस्थितीत माझी ड्यूटी केली आहे. माझ्या मुलीनेही असेच केले याचा मला अभिमान आहे. ती निर्भय आहे, असे स्वातीचे वडील एस. डी. रावल म्हणाले.

करोना Live: देशभरात करोनाचे ५२६ रुग्ण

धाडसी पायलट स्वाती रावल या इटलीला गेल्या. तेथे सर्व प्रवासी मायदेशी परतण्यासाठी तयारच होते. स्वाती त्यांना घेऊन भारतात परतल्या. त्याचे वडील रावल यांनी या प्रसंगाचे वर्ण करताना सांगितले की, 'दरम्यानच्या काळात मी काळजीत होतो. मात्र, तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी इटलीत अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणले. हे नक्कीच प्रशंसनीय आहे.'

स्वाती या दोन मुलांची आई आहेत. स्वाती यांनी रायबरेली येथून कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण घेतले होते. ती सन २००६ पासून स्वाती एअर इंडियात काम करत आहेत.

शाहीन बाग: पोलिसांनी 'असे' हटवले तंबू
दिल्लीत २४ तासात एकही नवा रुग्ण नाही
अज्ञात कारणानं शेकडो कोंबड्यांचा मृत्यू, नदीत फेकल्या

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज