अ‍ॅपशहर

coronavirus: 'असे' कळते करोनाग्रस्त पूर्ण बरा झाला की नाही!

करोनाची लागण झालेला एखादा रुग्ण पूर्णपणे बरा झाला हे कसे समजते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी सरकारचे निश्चित असे डिस्चार्ज धोरण आहे. त्यानुसार रुग्णाची २४ तासांमध्ये दोनदा सॅम्पल टेस्ट केली जाते. त्याच प्रमाणे त्याची रेडिओग्राफीही केली जाते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Mar 2020, 3:15 pm
नवी दिल्ली: देशभरात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ११० वर पोहोचली आहे. यां पैकी १३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र, एखादा रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यास काहीच हरकत नाही, हे नेमके कसे कळते हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असणार. जर रुग्ण पूर्णपणे बरा झाला नाही, तर हा आजार पसरण्याचा धोका असतो. हे लक्षात घेऊनच सरकारने रुग्णालयांसाठी एक डिस्चार्ज पोलिसी निश्चित केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corona-sample-test


त्यानुसार २४ तासांमध्ये दोन वेळा रुग्णाचे सॅम्पल टेस्ट केल्यानंतर जर ते निगेटीव्ह आले तर असा रुग्ण बरा झाल्याचे स्पष्ट होते आणि त्यानंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात येते.

सॅम्पल टेस्ट करण्याबरोबरच रुग्णाच्या छातीची रेडिओग्राफी देखील केली जाते. यात रुग्णाला श्वास घेण्यात काही त्रास आहे की नाही याबाबत स्पष्ट होते. या द्वारे रुग्णाच्या श्वासात विषाणूचा संसर्ग राहिलेला आहे की नाही याची खातरजमा केली जाते. या प्रक्रियेनंतरही रुग्णामध्ये संसर्ग आढळला नाही, तर मग तो पूर्णपणे बरा झाला असे सिद्ध होते आणि त्याला घरी सोडण्यात येते.

एखाद्या संशयित रुग्णाची चाचणी निगेटीव्ही आलेली असली तरी देखील त्याला १४ दिवसांसाठी वेगळे राहण्याचा सल्ला दिला जातो.

आता पर्यंत देशभरात ११५ रुग्ण

देशभरातील विविध राज्यांमधू आलेल्या माहितीनुसार, देशभरात सध्याच्या घडीला ११५ रुग्ण आढळले आहेत. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णांचा आकडा ११० इतका सांगितलेला आहे.

ओडिशामध्ये देखील करोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे. करोनामुळे आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. हे दोन्ही रुग्ण जवळपास ७० वर्षांचे होते. या दोघांना इतरही आजार होते.

करोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४००० हून अधिक लोकांवर लक्ष ठेवण्यात आले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यांना वेगळे राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात एका संशयिताचा एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, नंतर त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आलेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ३३ जणांना करोनाची लागण झाली आहे.

दुसऱ्या क्रमांकावर केरळ राज्य आहे. केरळमध्ये सध्या एकूण २२ रुग्ण आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज