अ‍ॅपशहर

IIT दिल्लीला सुट्टी, विद्यार्थ्यांचे 'जय करोना'चे नारे?

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून दिल्लीतील सर्व शिक्षण संस्था आणि कॉलेजेस ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. या निर्णयानुसार दिल्ली आयआयटीमधील विद्यार्थ्यांना वसतिगृह रिकामे करण्याची सूचना करण्यात आलीय. यादरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काही विद्यार्थी सुट्टी दिल्याने आनंदात 'जय करोना'चे नारे देत नाचताना दिसत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Mar 2020, 11:34 pm
नवी दिल्लीः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून दिल्लीतील सर्व शिक्षण संस्था आणि कॉलेजेस ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. या निर्णयानुसार दिल्ली आयआयटीमधील विद्यार्थ्यांना वसतिगृह रिकामे करण्याची सूचना करण्यात आलीय. यादरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काही विद्यार्थी सुट्टी दिल्याने आनंदात 'जय करोना'चे नारे देत नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा असल्याचा दावा केला जातोय. व्हिडिओ पाहून काहींनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांची तुलना शालेय विद्यार्थ्यांशी केलीय. तर आम्हीही सुट्टीची वाट पाहत आहोत, असं आयआयटी मद्रास, आयआयटी खडगपूरच्या विद्यार्थ्यांनीही म्हटलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम iit-delhi


करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना १५ मार्चपर्यंत वसतिगृह रिकामे करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत, असं आयआयटी दिल्लीतील विद्यार्थ्यांशी संबंधित असलेले डीन राजेश खन्ना यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या रुमच्या रजिस्टरमध्ये नोंद करावी आणि मेसचा फॉर्म भरावा. रुम खाली करण्याची आवश्यता नाही, असं ते म्हणाले.

भारतात करोनाचा दुसरा बळी; दिल्लीत महिलेचा मृत्यू

मास्क आणि सॅनिटायझर आता अत्यावश्यक वस्तू

आयआयटी दिल्लीने ३१ मार्चपर्यंत सर्व वर्ग आणि आयोजित कार्यक्रम स्थगित केले आहेत. पण पीएचडीचे विद्यार्थ्यांचे संशोधन अंतिम टप्प्यात असेल तर ते वसतिगृहात राहू शकतात. परिसरात राहणारे विदेशी विद्यार्थीही राहू शकतात, असं खन्ना यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, देशातील करोना रुग्णांची संख्या वाढून ८२ झालीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिलीय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज