अ‍ॅपशहर

करोना: देशभरात गेल्या २४ तासांमध्ये आढळले ३,५६१ नवे रुग्ण

देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आतापर्यंत देशभरात एकूण ५२ हजार ९५२ इतके करोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर, गेल्या २४ तासांमध्ये ३ हजार ५६१ नवे रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 May 2020, 2:56 pm
नवी दिल्ली: भारतातील कोरोना विषाणूच्या संसर्गाचा मोठ्या प्रमाणात कहर वाढत आहे. देशात सध्या लॉकडाउन असूनही करोना बाधितांची संख्या ५२ हजारच्या पुढे गेली आहे. भारतात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५२,९५२ इतकी झाली आहे. गेल्या तीन दिवसांच्या काळातच तब्बल १०,००० नवे करोनाबाधित रुग्ण नोंदवले गेले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corona-virus updates


गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ३,५६१ नव्या रुग्णाची नोंद करण्यात आली., तर एकूण ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण १५,२६७ लोक बरे झाले आहेत. मात्र, रुग्ण बरे होण्याचा विचार करता हा दर गेल्या २४ तासात २८.८३% इतका नोंदवला गेला. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउनचा तिसरा टप्पा देशभरात लागू करण्यात आला. हा टप्पा१७ मेपर्यंत राहणार आहे. दरम्यानच्या काळात, केंद्र सरकारने जनतेला काही सवलतीही दिल्या आहेत.

देशात कोरोनामुळे आतापर्यंत १,७८३ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत एकूण १५ हजाराहून अधिक लोक या आजारातून बरे झाले आहेत. कोरोनव्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळलेले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६,७५८ इतकी आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण १,२३३ रुग्ण आढळले. त्याचबरोबर मुंबई हे देशातील एकमेव असे शहर आहे जिथे कोरोनाना रुग्णांची संख्या १०,००० च्या वर गेली आहे. मुंबईत कोरोनाचे एकूण १०,७१४ रुग्ण आहेत.

महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आहेत. गुजरातमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या६,२०० पेक्षा जास्त आहे. यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो. दिल्लीत रुग्णसंख्या ५ हजारांपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये रुग्णांची संख्या ४ हजाराहून अधिक आहे.

दरम्यान, दिल्ली सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटीन ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र या पप्रवाशांना क्वारंटीन ठेवण्याच्या सोयीसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. नवी दिल्लीचे जिल्हाधिकारी विमानतळाजवळ ही व्यवस्था करणार आहेत, तर दक्षिण पूर्व आणि दक्षिण जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनाही अशी व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी २० वैद्यकीय पथके सज्ज असतील. डीजीएचएस त्यांना पीपीई किट इत्यादी देणार आहे. ही पथके विमानतळावर स्क्रीनिंगचे काम करतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज