अ‍ॅपशहर

फेऱ्या मारूनही हॉस्पिटलमध्ये लवकर बेड मिळाले नाही, करोनामुक्त होताच उभारले हॉस्पिटल

करोनामुळे रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील रुग्णसंख्या ही १५ लाखांवर गेलीय. महाराष्ट्र, तामिळनाडूसह दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत. कर्नाटकातही रुग्ण आढळून येत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांवर ताण आला आहे. सरकारी रुग्णालये भरल्याने नवीन रुग्णांना काही ठिकाणी बेड मिळत नाहीए. याच समस्येवर तोडगा काढत एका करोनामुक्त झालेल्या व्यक्तीने नवीन हॉस्पिटलच उभारले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jul 2020, 6:50 pm
बेंगळुरूः कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळून झाल्यानंतर बेड मिळवण्यासाठी एका रुग्णालयाच्या सतत फेऱ्या माराव्या लागल्या. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पाच रुग्णालयात नेले. पण कुणीही त्यांना दाखल करून घेतले नाही. एका मित्राच्या शिफारशीनंतर त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. करोनामुक्त झाल्यानंतर या व्यक्तीने सर्वप्रथम स्वत:चे एक हॉस्पिटलच बनवले. आपल्या सारखा इतर रुग्णांना त्रास होऊ नये, म्हणून त्याने हॉस्पिटलच सुरू केले. ही घटना कर्नाटकातील बेंगलुरूची आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम फेऱ्या मारूनही हॉस्पिटलमध्ये लवकर बेड मिळाले नाही, करोनामुक्त होताच उभारले हॉस्पिटल (प्रातिनिधिक फोटो)


संजय गर्ग (४९) यांची प्रकृती बिघडली होती. तपासणीत २८ जून रोजी त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर रुग्णालयात दाखल होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. आपल्यासह कुटुंबीयांना एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागल्या. पण त्यांना कोणीही दाखल केले नाही. यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत पडलं होतं, असं गर्ग म्हणाले.

उभारले कोविड केअर सेंटर

आपण अग्रवाल समाजातून येतो. करोनातून बरे होताच आपण समाजातील मान्यवरांशी चर्चा केली. त्यांच्याशी संपर्क केला. कोविड केअर सेंटर बनवण्याचे काम त्यांनी क्वारंटाइनमध्ये असतानाच सुरु केले होते, असं गर्ग यांनी सांगितलं. त्यांनी जिगनी होबलीच्या मीनाक्षी मॅडोसचे रुपांतर ४२ बेडच्या आग्र सेवा कोविड केअर सेंटरमध्ये केले.

बापरे! दोन दिवसांत १ लाख नवीन रुग्ण, देशातील करोना रुग्णसंख्या १५ लाखांवर

आरोग्य विभागातील २ डॉक्टर ४ परिचारिका

कोविड केअर सेंटरसाठी आपण आरोग्य विभाग आणि खासगी रुग्णालयांशी संपर्क साधला. त्यांनी आपल्या कोविड केअर सेंटरसाठी दोन डॉक्टर आणि चार परिचारिका दिल्या. इथल्या खोल्यांना रुग्णालयाप्रमाणे तयार केलं गेलं. बेड लावण्यात आले आणि आता डॉक्टर, परिचारिका रूग्णांवर उपचार करण्यास तयार झाले आहेत. या केंद्रात वायफाय सुविधा आणि इनडोर गेम्सची सुविधा देखील करण्यात आली आहे, असं संजय गर्ग म्हणाले.

राफेल आणले; विंग कमांडरच्या गावात साजरी झाली दीपावली

आधी विनामूल्य सुविधा, पण सल्ल्यानंतर शुल्क ठेवले

आपल्याला रुग्णालयात दाखल करून घेतले नाही तेव्हा त्यांना समस्येची जाणीव झाली. सुरुवातीला आपण रुग्णालय मोफत उपचारांसाठी तयार केलं. परंतु अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर किमान शुल्क आकारले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज