अ‍ॅपशहर

सध्याच्या शहरातच थांबा, प्रवास टाळा - मोदी

मोठ्या शहरांत लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर या शहरांत शिकण्यासाठी किंवा पोटापाण्यासाठी आलेल्या नागरिकांना आपल्या गावांचा रस्ता धरला आहे. या लोकांना शहरात अडकण्याची तसंच बंद असल्यानं सोई-सुविधा न मिळण्याची चिंता सतावत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2020, 5:34 pm
नवी दिल्ली : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. यावेळी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत 'घाबरू नका, सतर्क राहा' असं आवाहन केलंय. 'केवळ घरात राहणंच गरजेचं नाही तर तुम्ही ज्या शहरात, ज्या भागात असाल तिथंच राहणं आवश्यक आहे. अनावश्यक प्रवासामुळे ना तुम्हाला मदत होईल ना इतरांना' असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. आपल्या प्रत्येक छोट्या प्रयत्नाचा परिणाम मात्र मोठा असेल, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम करोना व्हायरस भारतात


वाचा : coronavirus: देशभरात २९४ करोनाबाधित रुग्ण

'होम क्वारंटाईन'चे निर्देश पाळा

'डॉक्टरांनी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचं पालन करा. ज्या नागरिकांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितलं आहे त्यांना निर्देशांचं पालन करण्याची मी विनंती करतो. तुमच्यासोबतचं तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रमंडळी यामुळे सुरक्षित राहतील' असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.



नागरिकांंची शहरांतून गावाकडे धाव

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शहरं 'लॉकडाऊन' करण्यात आल्यानं या शहरांत शिकण्यासाठी किंवा पोटापाण्यासाठी आलेल्या नागरिकांनी आपापल्या भागांत जाण्यासाठी रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर गर्दी केलेली दिसतेय.


वाचा : शाहीन बाग: जनता कर्फ्यूचं आवाहन धुडकावलं

वाचा : ही लक्षणं असणाऱ्या प्रत्येकाची करोना चाचणी

'कोविड १९ एमर्जन्सी फंड'मध्ये मालदीव सरकारचं योगदान

यासोबच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'कोविड १९ एमर्जन्सी फंड'मध्ये मालदीव सरकारकडून २ लाख अमेरिकन डॉलर्स देऊन योगदान दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांना टॅग करत 'हे योगदान दुर्धर आजाराविरुद्ध आपल्या सामूहिक लढाईच्या संकल्पाला आणखीन मजबूत करेन' असं मोदींनी ट्विट केलंय.


देशात २९४ करोनाबाधित

सरकारनं जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, आत्तापर्यंत संपूर्ण देशभर २९४ करोनाबाधित रुग्ण आढळलेत. यामध्ये ३९ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. देशात चार जणांनी आपले प्राण गमावलेत.

वाचा : सुटले! कनिकाला भेटलेल्या ४५ जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह

वाचा : धक्कादायक! ४ करोना रुग्णांचा मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास

२२ मार्च रोजी 'जनता कर्फ्यु'

यापूर्वी, गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांना 'जनता कर्फ्यु'चं आवाहन केलंय. त्यानुसा, रविवारी २२ मार्च रोजी सकाळी ७.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत पंतप्रधानांनी नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलंय आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज