अ‍ॅपशहर

'करोनावरील 'मेड इन इंडिया' लसची २५ देशांना प्रतीक्षा'

भारतात करोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. भारतातील लसीचे अतिशय कमी साइड इफेक्ट दिसून आल्याने अनेक देशांनी या लसींची मागणी केली आहे. भारताने काही देशांना लसींचा पुरवठाही केला आहे. तर २५ देश मेड इन इंडिया लसीच्या प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Feb 2021, 7:57 pm
नवी दिल्ली: भारताने आतापर्यंत १५ देशांना करोनावरील लसचा पुरवठा ( covid 19 vaccine ) केला आहे. अजून २५ देश भारतात तयार होणाऱ्या करोनावरील लसच्या ( coronavirus vaccine ) प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ( s jaishankar ) यांनी शनिवारी दिली. देशात तीन श्रेणींमधील देश भारतातील लस घेण्यास इच्छुक आहेत. गरीब देश, किमतीवरून संवेदनशील असलेले देश आणि औषध कंपन्यांशी करार करणाऱ्या देशांचा यात समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus vaccine
'करोनावरील 'मेड इन इंडिया' लसची २५ देशांना प्रतीक्षा'


आपण १५ देशांना आधीच लसचा पुरवठा केला आहे. आणखी २५ देशांना लसची प्रतीक्षा आहे. पण आज महत्त्वाची बाब म्हणजे भारत यामुळे जगाच्या नकाशावर अधिक ठळकपणे उदयास आला आहे, असं जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

परराष्ट्रमंत्र्यांचा चीनला सूचक इशारा, 'करोनानंतरचा भारत पूर्वीपेक्षा...'

रतन टाटा भावुक, ''भारतरत्न'साठीचं कॅम्पेन थांबवा, माझं भाग्य...'

काही गरीब देशांना अनुदान तत्त्वावर लसचा पुरवठा केला जात आहे. तर भारत सरकार लस उत्पादकांकडून खरेदी करत असलेल्या किंमतीवर काही देशांना लस हवी आहे. भारताला 'जगाची फार्मसी' म्हणून स्थापन करण्याचा पंतप्रधान मोदींचा मानस आहे, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज