अ‍ॅपशहर

करोनाविरोधी लढाई; लसीकरण मोहीम १३-१४ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता

करोनावरील लसीकरण मोहीम लसीला मंजुरी मिळाल्याच्या १० दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिलीय. यानुसार १३-१४ जानेवारीपासून लसीकरण सुरू होऊ शकते. लसीकरण कधीपासून सुरू करायचं याचा अंतिम निर्णय सरकारच्या हाती आहे, असं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jan 2021, 6:09 pm
नवी दिल्लीः करोना लस मंजूर झाल्यानंतर दहा दिवसांत ती रोलआउट होऊ ( coronavirus vaccine ) शकते, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. डीसीजीआयने रविवारी ३ जानेवारीला करोना लसीला मंजुरी दिली. यानुसार करोना लसीकरण मोहीम येत्या १३ किंवा १४ जानेवारीपासून देशात सुरू होऊ शकते. केंद्रीय आरोग्य सचिवांनी याबाबत माहिती दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corona vaccination
करोनाविरोधी लढाई; लसीकरण मोहीम १३-१४ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता ( प्रातिनिधिक फोटो )


सरकार करोना लस १० दिवसांत आणण्यास तयार आहे. करोनावरील लसीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे लसीकरण मोहीम १० दिवसांत सुरू होईल, अशी माहिती आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने रविवारी अ‍ॅस्ट्रॅझेनका आणि ऑक्सफोर्डच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेकची 'कोवॅक्सिन' लसला मंजुरी दिली होती. देशात पहिल्या टप्प्यात ३ कोटी नागरिकांना करोनाची लस दिली जाईल. त्यात आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लस दिली जाईल.

देशात ४ प्राथमिक लस स्टोअर अस्तित्त्वात आहेत. ही स्टोअर कर्नाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे आहेत. यासह देशात ३७ लस केंद्रे आहेत. या ठिकाणी लस साठवली जाईल. इथून लस मोठ्या प्रमाणात जिल्हा पातळीवर पाठवली जाईल. जिल्हास्तरावरून या लसी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या फ्रीजर बॉक्समध्ये पाठवल्या जातील. इथून ही लस नागरिकांना दिली जाईल, असं राजेश भूषण यांनी सांगितलं.

लसीवरील वाद मिटला; सीरम - भारत बायोटेकचं संयुक्त निवेदन, म्हणाले...

कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड लशीच्या मंजुरीवर तज्ज्ञांचा सवाल

भारतात जवळजवळ २८९००० कोल्ड चेन पॉईंट्स आहेत. जिथे या लसी सुरक्षितपणे ठेवल्या जाऊ शकतात. गरजू देशांना करोना लस देण्याचं आश्वासन भारताने दिलं आहे. भारताने अद्याप करोना लसीच्या निर्यातीवर कुठलीही बंदी घातलेली नाही, असं आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज