अ‍ॅपशहर

covaxin vaccine : करोनावरील कोवॅक्सिन लसीचे उत्पादन दुप्पट होणार, केंद्राची माहिती

देशात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे करोनावरील लसीकरण मोहीमही वेगात सुरू आहे. यामुळे केंद्र सरकारने स्वदेशी कोवॅक्सिन लसीचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Apr 2021, 3:46 am
नवी दिल्लीः देशात काही दिवसांपूर्वी करोनावरील लसीचा तुटवडा जाणवत होता. या पार्श्वभूमीवर करोनावरील स्वदेशी लस कोवॅक्सिनचे उत्पादन मे-जून २०२१ मध्ये दुप्पट करण्यात येणार आहे. तर जुलै - ऑगस्टमध्ये हे उत्पादन ६ ते ७ पटीने वाढवण्यात येईल. केंद्र सरकारने शुक्रवारी ही माहिती दिली. देशात करोना संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Covaxin
करोनावरील कोवॅक्सिन लसीचे उत्पादन दुप्पट होणार, केंद्राची माहिती


करोनावरील लसीची निर्मिती आणि उत्पादनासाठी केंद्र सरकारने सुविधा आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आर्थिक पाठबळ दिलं आहे. सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाकडून आर्थिक पाठबळ दिले जात आहे. यातून लसीचे उत्पादन आणि निर्मिती क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

करोनावरील स्वदेशी कोवॅक्सिन लसीच्या उत्पादनाची क्षमता येत्या मे-जूनमध्ये दुप्पट केली जाईल. यानंतर ती आणखी वाढवून जुलै-ऑगस्टमध्ये ६ ते ७ पटीने वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली.

सावधान! देशात करोनाच्या नवीन व्हेरियंटचे ११८९ रुग्ण आढळले, आरोग्य मंत्रालयाचा इशारा

एप्रिमध्ये कोवॅक्सिन लसीचे उत्पादन १ कोटीहून अधिक डोसपर्यंत वाढवण्यात आले आहे. हे उत्पादन जुलै-ऑगस्टमध्ये ६ ते ७ कोटी डोसपर्यंत नेण्यात येईल. आणि सप्टेंबरपर्यंत हे उत्पादन १० कोटी डोस इतके होईल, असा विश्वास मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

adar poonawall : सीरमच्या अदर पुनावालांचे अमेरिकेच्या अध्यक्षांना आवाहन..

महत्वाचे लेख