अ‍ॅपशहर

भारतीयांनो सावध व्हा! नव्या संकटाची देशात एन्ट्री, यावर उपायही नाही; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

Omicron BF.7 In India : कोविड-19 च्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे नवीन सब-व्हेरिएंट भारतात दाखल झाले आहे आणि दिल्लीचे माजी एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी झपाट्याने पसरणाऱ्या ओमिक्रॉन सब-व्हेरिएंटच्या विरोधात इशारा दिला आहे. यामुळे आता प्रत्येकाने सावधान राहण्याची गरज आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2022, 7:55 pm
Corona cases in India : देशात पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १९४६ नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, झारखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मणिपूर आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये करोनाची प्रकरणं वाढत आहेत. अलीकडेच, महाराष्ट्रातही करोनाच्या नवीन XBB प्रकाराची १८ प्रकरणं समोर आली आहेत. त्यादृष्टीने तिथे अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम omicron new variant in india


Omicron चे सब-व्हेरिएंट BF.7 आणि BA.5.1.7 यांचाही भारतात शिरकाव झाला आहे, अशी माहिती गुजरात जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राने दिली. दिल्ली एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी ओमिक्रॉनच्या वेगाने पसरणाऱ्या या जीवघेण्या संसर्गाबद्दल सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

सावधान! पुढच्या ३-४ आठवड्यात भारतावर मोठं संकट, तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली
काय आहे अलर्ट?

दिल्ली एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, 'करोनाच्या या झपाट्याने पसरणाऱ्या ओमिक्रॉन प्रकाराचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यावर कोणतीही लस नसली तरी आता बहुतेक लोकांपैकी लसीकरण करण्यात आले होते, त्यामुळे लोकांमध्ये विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. पण यामुळे नियम तोडू नका. दिवाळीमध्ये गर्दीचं प्रमाण वाढणार असल्यामुळे मास्क वापरणं, हात स्वच्छ धुणं, आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.'

या लोकांमध्ये पसरू शकतो संसर्ग...

एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया पुढे म्हणाले की, "सर्व लोकांनी हा विषाणू टाळण्यासाठी मास्क लावला पाहिजे. यामुळे वृद्धांमध्ये आणि कोणत्याही आजाराचा धोका असलेल्या लोकांमध्ये विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखता येईल. जर तुम्ही बाहेर जात असाल आणि विशेषतः गर्दीच्या ठिकाणी, तर तुम्ही मास्क घालणे आवश्यक आहे. ज्या लोकांना आजाराचा धोका आहे त्यांनीही विशेष काळजी घ्यावी. वृद्ध लोकांनी घराबाहेर जाणे टाळावे. कारण, गर्दीच्या ठिकाणी संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते"
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख