अ‍ॅपशहर

लढाई करोनाशी: 'G-20' राष्ट्र आज ठरवणार रणनीती

करोना या जागतिक साथीच्या आजाराने जगभरात कहर केल्याने जगातील अनेक देश त्रस्त झाले आहेत. भारतही या आजाराचा सामना करण्यासाछी मैदानात उतरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज G-20 राष्ट्रांशी चर्चा करणार आहेत. या राष्ट्रांच्या व्हर्च्युअल बैठकीत करोनाशी लढण्याची रणनीती ठरवली जाणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Mar 2020, 9:41 am
नवी दिल्ली: करोना या जीवघेण्या साथीच्या आजाराचा सामना करणाऱ्या जगाला वाचवण्यासाठी आज G-20 राष्ट्र 'व्हर्च्युअल बैठक' घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. करोनाशी लढण्यासाठी विशेष रणनीती तयार करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे G-20 देशांशी आपली रणनीती स्पष्ट करतील असे बोलले जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm-modi


आज होणाऱ्या G-20 राष्ट्रांची ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीबाबत पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे. कोविड-१९ या जागतिक साथीच्या आजाराशी लढण्यासाठी G-20 देशांची महत्वाची वैश्विक भूमिका आहे, असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा होईल अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली आहे. या बैठकीचा समन्वय अध्यक्ष देश सौदी अरब आहे.

करोनामुळे मंदीचा धोका वाढतोय

या बैठकीत जगभरातील १९ औद्योगिक देश आणि युरोपीय संघाचे नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जागतिक साथीचा आजार असलेल्या करोनाविरोधात योजना तयार करण्यावर चर्चा करतील. या बरोबरच जगभरातील अर्थव्यवस्थांवर होणाऱ्या याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी योजना तयार केली जाणार आहे. दरम्यान, करोना विषाणूच्या उद्रेकामुळे जगभरात मंदीचे संकट अधिक वाढताना दिसू लागले आहे.

Lockdown in India For 21 Days Live: रुग्णांची संख्या ६०६ वर

मोदींच्या पुढाकाराने होत आहे बैठक

गेल्या आठवड्यात सौदीचे युवराज प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि पंतप्रधान मोदी यांच्यात टेलिफोनवर चर्चा झाल्यानंतर ही बैठक होत आहे. या संपूर्ण बैठकीचा समन्वय सौदी अरब हा देश करत आहे. पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मोरिसन यांच्याशी देखील चर्चा केली होती.

घाबरू नका; 'ही' दुकाने सुरूच राहणार: केंद्र सरकार

मोदी बनले सार्क देशांचे नेते

सार्क देशांमध्ये भारताव्यतिरिक्त अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. पाकिस्तानमुळे गेल्या काही काळापासून सार्क परिषद टळली आहे. मात्र, ही संधी साधत पंतप्रधान मोदी यांनी सार्क देशांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आमंत्रण दिले. त्यावेळी झालेल्या चर्चेत पाकिस्तानला सहभागी व्हावे लागले होते. पंतप्रधान मोदी यांच्या या पुढाकारानंतर चीनने देखील दक्षिण आशियायी देशांसोबत व्हर्च्युअल बैठक ओयोजित केली होती.

काश्मीर ते कर्नाटक... लॉकडाऊन तोडल्यानंतर 'अशा' शिक्षा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज