अ‍ॅपशहर

covid fourth wave : भारतात करोनाची चौथी लाट येणार, कधी? IIT कानपूरच्या संशोधकांनी सांगितले...

करोनाची तिसरी लाट देशात थंडावली आहे. पण आता शास्त्रज्ञांनी करोनाच्या चौथ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे भारतीयांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी करोनाच्या चौथ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे.

Authored byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Feb 2022, 2:06 pm
कानपूर : करोनाच्या तिसर्‍या लाटेत ओमिक्रॉनचा वेरियंटचा प्रभाव मंदावल्यानंतर आता चौथ्या लाटेबाबतही ( covid fourth wave india ) अंदाज वर्तवला जात आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) च्या गणित आणि सांख्यिकी विभागातील ( iit kanpur scientists ) संशोधकांनी गॉसियन वितरण प्रणालीच्या आधारे चौथी लाटे कधी येऊ शकते, याचा अंदाज वर्तवला आहे. यासाठी अवर वर्ल्ड इन डेटा नावाच्या वेबसाइटवरून आतापर्यंत करोनाच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला आहे. हा शोध MadeArchive या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम covid fourth wave india iit kanpur scientists prediction in research
भारतात करोनाची चौथी लाट कधी येणार? IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांनी सांगितले...


आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी केला अभ्यास

करोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत करोनाच्या वेगवेगळ्या वेरियंटचा प्रसार आणि त्यांच्या प्रभावाविषयी जाहीर केलेल्या डेटाचा अभ्यास आयआयटीचे शास्त्रज्ञ प्रा. शलभ आणि सहयोगी प्राध्यापक सुभ्रा शंकर धर, संशोधक साबरा प्रसाद राजेश भाई यांनी भारतात करोनाच्या चौथ्या लाटेचा अंदाज लावण्यासाठी केला. तसेच गॉसियन वितरण मिश्रण प्रणालीवर आधारित डेटाची गणना केली आणि चौथी लाट कधी टिपेला पोहू शकते, यासाठी वेळेची गणना करण्याकरता बूट स्ट्रॅप पद्धत वापरली. त्यानुसार डिसेंबर २०१९ मध्ये जगात करोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. यानंतर सर्व देशांमध्ये व्हायरसच्या संसर्गा होऊ लागला. झिम्बाब्वे आणि भारतातील तिसऱ्या लाटेची आकडेवारी जवळपास सारखीच होती. सध्या झिम्बाब्वेमध्ये चौथी लाट सुरू झाली आहे. या कारणास्तव झिम्बाब्वेच्या डेटा बेस आधारावर डिपार्टमेंटच्या टीमने गॉसियन वितरण मिश्रण प्रणाली वापरून भारतातील चौथ्या लाटेचा अंदाज लावला आहे.

भारतात करोनाची चौथी लाट प्रारंभिक डेटा प्राप्त झाल्यापासून ९३६ दिवसांनी येऊ शकते. प्रारंभिक डेटा ३० जानेवारी २०२० ला उघड झाला होता. या आधारावर चौथी लाट २२ जून २०२२ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर चौथी लाट २३ ऑगस्टला टिपेला पोहोचू शकते आणि २४ ऑक्टोबरला संपू शकते. चौथ्या लाटेचा अंदाज भारताबरोबरच इतर देशांच्या डेटावरही समान पद्धती वापरून वर्तवला जाऊ शकतो, असे डॉ. शलभ यांनी म्हटले. रुग्णांची संख्या खूप मोठी असेल, तर भौतिक घटनांचे वर्णन करण्यासाठी गॉसियन वितरण प्रणाली वापरली जाते. हे एक गणितीय मॉडेल आहे.

सध्या झिम्बाब्वेसह दक्षिण आफ्रिका देखील चौथ्या आणि तीव्र लाटेचा सामना करत आहे, असे तज्ञांच्या मत आहे. झिम्बाब्वेच्या करोना रुग्णांची संख्या प्रशिक्षण डेटा सेट म्हणून निर्धारित केली गेली आहेत. भविष्यात करोना व्हायरसची प्राणघातकता कालांतराने कशी बदलत आहे हे जाणून घेण्यासाठी आता वैज्ञानिक या टप्प्यावर डेटाचे मूल्यांकन करत आहेत.

युक्रेनमध्ये शेकडो भारतीय विद्यार्थी अडकले; PM मोदींनी राज्यांना केला 'हा' मोठा सवाल

'नवीन म्युटंट्सबद्दल काहीही सांगता येणार नाही'

करोनाच्या चौथ्या लाटेबाबत काहीही सांगणे घाईचे आहे. डेल्टाक्रोन नावाचा नवीन वेरियंट केव्हा येईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. कोणत्याही स्टॅटिक पद्धतीने डेटा काढला आहे, हे पाहावे लागेल. आता भारतीयांनी ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही प्रकारांसाठी प्रतिकारशक्ती विकसित केली आहे. त्यामुळे नवीन वेरियंटचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही, असे आयआयटीचे पद्मश्री पुरस्कार विजेते प्रा. मनिंद्र अग्रवाल म्हणाले.

ayushman bharat digital mission : देशात सुरू होणार 'आयुष्मान भारत डिजिटल मिशन', १६०० कोटींचा बजेट मंजूर
लेखकाबद्दल
सचिन फुलपगारे
सचिन फुलपगारे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत, मीडियामध्ये काम करण्याचा १९ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्न आणि मुद्द्यांवर काम करण्यात आवड आहे. सतत नवीन शिकण्याची तयारी.... आणखी वाचा

महत्वाचे लेख