अ‍ॅपशहर

vaccination : लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्यांना प्राधान्य द्या, केंद्राचे राज्यांना आदेश

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाच्या मुद्द्यावर राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना आज महत्त्वाचा आदेश दिला आहे. दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करावे, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 May 2021, 6:10 pm
नवी दिल्लीः देशात करोनावरील लसीकरण मोहीम ( covid vaccination ) सुरू आहे. पण यात अनेक नागरिकांना पहिला डोस मिळाला असून दुसऱ्या डोसची तारीख उलटूनही तो ( covid vaccination in india ) मिळालेला नाही. यामुळे लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी होताना दिसतेय. आता केंद्र सरकारने दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा दिला आहे. दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण ( vaccination ) करावे, असे आदेश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vaccination
लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्यांना प्राधान्य द्या, केंद्राचे राज्यांना आदेश


केंद्र सरकारडून पुरवठा होत असलेल्या लसींच्या साठ्यापैकी ७० टक्के साठा हा दुसरा डोस बाकी राहिलेल्या नागरिकांसाठी राज्यांनी राखीव ठेवावा. उर्वरीत ३० टक्के डोस हे पहिल्यांदा लस घेणाऱ्यांना द्यावेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं.

केंद्र सरकारने आज देशातील लसीकरण मोहीमेचा आढावा घेतला. यानंतर राजेश भूषण यांनी माहिती दिली. येत्या ३ दिवसांत राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना करोनावरील लसीचे ७ लाख डोसचे वाटप करण्यात येईल, असं राजेश भूषण म्हणाले.

दिलासा! महाराष्ट्र, दिल्लीसह १८ राज्यांत करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या होतेय कमी

आतापर्यंत १७ कोटी, २७ लाख १० हजार ०६६ नागरिकांचे लसीकरण

राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना केंद्र सरकारने आतापर्यंत लसींच्या १८ कोटी डोसचे मोफत वितरण केले आहे. अजूनह राज्यांकडे लसींचे ९० लाख डोसेस उपलब्ध आहेत. येत्या ३ दिवसांत राज्यांना ७ लाख डोसेसचे वितरण केले जाईल. हरयाणा, आसाम आणि राजस्थानमध्ये करोनावरील लसीचे सर्वात कमी डोस वाया गेले आहेत. या राज्यांमध्ये अनुक्रमे ६.४९ टक्के, ५.९२ टक्के आणि ५.६८ टक्के इतके डोस वाया गेले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

Uttar Pradesh: बिहारनंतर उत्तर प्रदेशातही गंगेत मृतदेह तरंगताना आढळले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज