अ‍ॅपशहर

Vaccination : लसीकरण फास्ट ट्रॅकवर! देशात सलग दुसऱ्या दिवशी दिले ६० लाखांहून अधिक डोस

करोनावरील लसीकरण मोहीमेला वेग येताना दिसत आहे. लसीकरणात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आघाडीवर आहेत. देशात सलग दुसऱ्या दिवशी ६० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jun 2021, 8:30 am
नवी दिल्लीः देशात सलग दुसऱ्या दिवशी ६० लाखांहून अधिक नागरिकांना करोनावरील लस देण्यात आली ( Vaccination In India ) आहे. cowin.gov.in वर गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत ६०.६३ लाख नागरिकांनी लस घेतल्याची माहिती देण्यात आली. २१ जूनपासून देशात व्यापक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. गेल्या ४ दिवसांत २.७० कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. २१ जूनला देशात विक्रमी ९०.८६ लाख, २२ जूनला ५४.२२ लाख, २३ जूनला ६४.८३ लाख डोस देण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vaccination in india
लसीकरण फास्ट ट्रॅकवर! देशात सलग दुसऱ्या दिवशी ६० लाखांहून अधिक डोस दिले गेले


देशात गुरुवारी सर्वाधिक ८.५१ लाख डोस हे उत्तर प्रदेशात दिले गेले. यापूर्वी २२ जूनलाही यूपीत ८ लाखांहून अधिक नागरिकांना लस दिली गेली होती. ७.४४ लाख डोस देत मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशात ४ दिवसांत ३३ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. यात सर्वाधिक १७ लाख डोस २१ जूनला देण्यात आले होते.

याशिवाय गुजरात आणि महाराष्ट्रात ४-४ लाख डोस दिले गेले. ३ लाखाहून अधिक डोस हे कर्नाटक, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये दिले गेले. राजधानी दिल्लीत मागे अजून फक्त १.५७ लाख नागरिकांना लस दिली गेली.

लसीकरणादरम्यान अक्षम्य हलगर्जीपणा, डोस न भरताच तरुणाला दिले इंजेक्शन

४ दिवसांत ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येहून अधिक नागरिकांचे लसीकरण

भारतात गेल्या ४ दिवसांत जेवढ्या नागरिकांचे लसीकरण झाले त्याहून अधिक लोकसंख्या फक्त ५० देशांमध्ये आहे. १८५ देशांची लोकसंख्या याहूनही कमी आहे. भारताने यादरम्यान ऑस्ट्रेलिया आणि उत्तर कोरियाच्या लोकसंख्येहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले आहे. उत्तर कोरियाची लोकसंख्या ही २.५७ कोटी आहे तर ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या २.५४ कोटी.

covid vaccine : लसीच्या वितरणात पारदर्शकता नाही? केंद्राने दिले आरोपांना उत्तर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज