अ‍ॅपशहर

coronavirus : चांगली बातमी! पाटण्यातील एम्समध्ये मुलांवर करोनावरील लसीची चाचणी सुरू

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर स्थिती निर्माण झाली. आता तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे लहान मुलांसाठी करोनावरील लसीची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांवर लसीची चाचणी सुरू झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jun 2021, 8:40 am
पाटणाः देशात मुलांवर करोनावरील लसीची ( covid vaccine ) चाचणी सुरू झाली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वदेशी लसीद्वारे ही चाचणी केली जात ( clinical trial of covaxin on children ) आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर लस विकसित करण्यात मदत होणार आहे. पाटण्यातील एम्समध्ये ( aiims patna ) भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरू झाली आहे. आतापर्यंत ३ मुलं या चाचणीत सहभागी झाली आहेत. पाटणा एम्समधील कोविड प्रभारी डॉक्टर संजीव कुमार यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. १२ ते १७ वर्षांवरील मुलांवर मंगळवारी ही चाचणी सुरू झाली. पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी तीन मुलांना इंजेक्शन दिलं गेलं. इंजेक्शन दिल्यानंतर तिन्ही मुलं स्वस्थ आहेत, असं संजीव कुमार यांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम covaxin vaccine
मुलांवर करोनावरील लसीची पाटण्यातील एम्समध्ये चाचणी सुरू


एका महिन्यात ५२५ मुलांवर अशा प्रकारे चाचणी केली जाणार आहे. यातील किमान १०० मुलांनी व्हॉलिंटियर म्हणून नोंदणी केली आहे. त्यांची तपासणी केल्यानंतर तीन मुलांवर चाचणी केली गेली. दुसऱ्या टप्प्यात लसीचा मुलांवर कुठलाही साइड इफेक्ट न दिसल्यावर तिसऱ्या टप्प्यात लस दिली जाईल आणि त्याचा योग्य प्रभाव दिसून आल्यावर लस मंजुरीसाठी पाठवली जाईल, असं संजीव कुमार म्हणाले.

केंद्राच्या लसीकरण धोरणाचे सुप्रीम कोर्टाने 'असे' काढले वाभाडे! काय घडलं कोर्टात? वाचा...

देशातील अनेक बड्या नेत्यांसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुलांसाठी तातडीने करोनावरील लस उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. यामुळे करोनाच्या तिसऱ्या लाटेपासून त्यांचा बचाव करता येईल. करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं बोललं जात आहे. अमेरिका, कॅनडासह अनेक देशांमध्ये १६ वर्षांवरील युवकांच्या लसीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. जगभरात लहान मुलांसाठी लसीची चाचणी सुरू आहे.

लस उत्पादनात आडकाठी आणणाऱ्यांवर हत्येचा खटला भरला पाहिजेः हायकोर्ट

महत्वाचे लेख