अ‍ॅपशहर

covid vaccine : करोनावरील लसीची खरेदी आणि किंमतीवरून संसदीय समितीच्या बैठकीत खडाजंगीः सूत्र

देशात करोनावरील लसीकणर मोहीम सुरू आहे. २१ तारखेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना केंद्र सरकारकडून मोफत लस दिली जात आहे. पण लसीची किंमत आणि खरेदीवरून संसदेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या बैठकीत खडाजंगी झाली. विरोधी पक्षाचे खासदार आणि सत्ताधारी भाजपच्या खासादार आमने-सामने आले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jun 2021, 8:28 am
नवी दिल्लीः संसदेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी जोरदार खडाजंगी झाली. समितीच्या बैठकीत लसीची खरेदी आणि किंमतीतील तफावतीचा मुद्दा येताच भाजपचे खासदार भडकले. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या बैठकीत लसीच्या खरेदीचा मुद्दा उपस्थित केल्याने भाजप खासदारांनी त्याला विरोध केला. करोनावरील लसीचा विकास आणि करोना व्हायरस आणि त्याच्या वेरियंटमधील जेनेटिक सिक्वेंसिंग हा बैठकीचा विषय होता. यात आरोग्य तज्ज्ञ विजय राघवन, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल हे अधिकारीही उपस्थित होते, असं सूत्रांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parliament of india
करोनावरील लसीची खरेदी आणि किंमतीवरून संसदीय समितीच्या बैठकीत खडाजंगीः सूत्र


विरोधी पक्षांच्या खासदारांनी बैठकीत लसीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. लसीची खरेदी, किंमत आणि लसीकरणात इतकी तफावत का आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजप खासदारांनी याला तीव्र विरोध केला. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय फक्त शोध आणि विकासाचे काम करते. लसीची खरेदी, किंमत किंवा लसीकरण हे मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही. यामुळे असे प्रश्न उपस्थित करून राजकारण करू नये, असं भाजप खासदार म्हणाले.

covid vaccine : 'सप्टेंबर-ऑक्टोबरपासून लहान मुलांचं लसीकरण सुरू होऊ शकते'

सल्लामसलत करण्यासाठी भाजप खासदार बैठकीतून बाहेर आले. काही वेळाने ते पुन्हा बैठकीत सहभागी झाले. समिती निश्चित अजेंड्यानुसार काम करेल, असं आश्वासन संसदीय समितीचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी भाजप खासदारांना दिलं. यानंतर समितीने लसीचे संशोधन आणि विकासावरून विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कामाचे कौतुक केले.

लसीकरणाच्या 'वर्ल्ड रेकॉर्ड'मागचं रहस्य, चिदंबरम यांचा मोदी सरकारवर निशाणा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज