अ‍ॅपशहर

प्रेमाचा खून! १९ वर्षीय तरुणीची गोव्याच्या किनारी निर्घृण हत्या, प्रियकराने केला धक्कादायक खुलासा

प्रेम प्रकरणांमुळे गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गोव्यातूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका तरुणीची प्रियकरानेच थेट समुद्रकिनारी हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2022, 2:44 pm
गोवा : दक्षिण गोव्यातील वेल्साव समुद्रकिनारी गुरुवारी दुपारी एका १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दिया नाईक असं पीडितेचं नाव असून तिच्या मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर धारदार वस्तूने वार केलेल्या अनेक जखमा आढळून आल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम south goa crime branch


अधिक माहितीनुसार, दिया ही मूळची नवीन वड्डेमची रहिवासी असून बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह वेल्साव येथील दांडो समुद्रकिनारी झुडपात पडलेला आढळून आला. दियाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या मुलीला बुधवारी दुपारी शेवटचं पाहिलं होतं. जेव्हा ती दुपारच्या जेवणानंतर कुटुंबाच्या किराणा दुकानात आली होती.

महत्त्वाची बातमी! ...म्हणून ३१ मे रोजी देशभरात रेल्वे धावणार नाही?, वाचा सविस्तर
इतकंच नाहीतर यावेळी त्यांनी दियाचं किशन कलंगुटकर याच्यासोबत रिलेशनशिप असल्याचीही माहिती दिली. पण त्या दोघांमध्ये सध्या नातं नव्हतं असाही खुलासा त्यांनी पोलिसांजवळ केला. त्याआधारे पोलिसांनी कलंगुटकरचा वास्को इथं माग काढला आणि त्याला गुरुवारी अटक करण्यात आली.

या तपासात पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी यांसंबंधी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगतिलं की, आरोपीचं महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर प्रेम होते आणि बुधवारी तिच्यासोबत तो समुद्रकिनारी फिरायला गेला होता. यावेळी तुझ्यासोबत संबंध ठेवायचे नाहीत, असं तिने सांगितल्यानंतर आरोपी तिच्यावर नाराज होता. याच नैराश्यातून त्याने तिच्यावर अनेक वेळा चाकूने वार केले आणि तिला जागीच ठार केले.

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यानंतर आरोपीने पीडितेचा मृतदेह समुद्रकिनारी असलेल्या झुडपात फेकून दिला. मृतदेह सापडल्यानंतर वास्को पोलिसांनी तपास सुरू केला आणि २४ तासांत आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज