अ‍ॅपशहर

फेसबूकवरून प्रेम नंतर धोका; ३ वेळा विकलं, अनेकदा बलात्कार; पीडितेने सांगितला थरार

West Bengal Crime News Today : सोशल मीडियावरून प्रेम केल्यानंतर एका तरुणीच्या वाट्याला असं काही आलं की तुम्ही विश्वास ठेवणार नाही. कारण, १५ वर्षांची मुलगी आता २२ वर्षांची झाली आहे. या काळात तिला तब्बल ३ वेळा विकण्यात आलं आणि अनेकदा तिच्यावर बलात्कारही झाला.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Aug 2022, 3:02 pm
उत्तर २४ परगणा : सोशल मीडियावर एका मुलाशी मैत्री आणि नंतर त्याच्यावर प्रेम करणं ही १५ वर्षांच्या मुलीसाठी आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली आहे. खरंतर एकत्र राहण्याचं स्वप्न दाखवून पळून गेलेल्या पश्चिम बंगालच्या या मुलीसोबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे चार महिन्यात या मुलीची तीनदा विक्री करण्यात आली. इतकंच नाही तर यावेळी अनेकांनी तिच्यावर बलात्कारही केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime news today in marathi


मिळालेल्या माहितीनुसार, तिचे ३० वर्षीय तरुणाशी बळजबरीने लग्नही लावण्यात आले होते. पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात राहणाऱ्या एका मुलीची ७ वर्षांपूर्वी एका मुलासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली होती. दोघेही प्रेमात पडले. ही मुलगी शाळेच्या बहाण्याने घरातून पळून गेली होती. ७ जानेवारी २०१५ रोजी कोलकाता येथील सायन्स सिटीजवळ ती त्या मुलाला भेटली. येथून ती बाबूघाट येथे गेली. तेथून त्याने मुलासोबत बिहारला जाणारी बस पकडली.

१४ कोटींची संपत्ती ९ तास चौकशी! राऊतांना ताब्यात घेतलेल्या भांडूपमधील बंगल्याची किंमत किती?
मुलीला तीन वेळा विकलं...

आरोपीने मुलीला बसमध्ये सोडले आणि लवकरच परत येतो असे सांगून पळून गेल्याचे तपासात समोर आले आहे. पण तो आला नाही. यावेळी त्याने मुलीला दीड लाख रुपयांना विकून तो पळून गेला. यानंतर आणखी एक व्यक्ती बसमध्ये चढला, त्याने स्वतःला आरोपीचा मित्र सांगितला. तो मुलीला हावडा स्टेशनवर घेऊन गेला. तेथून तो ट्रेनने बिहारला पोहोचला. बिहारमध्ये तरुणीची कमल नावाच्या व्यक्तीला विक्री करण्यात आली. तो तिला यूपीतील बिजनौर येथील चित्रा या महिलेकडे घेऊन गेला.

चित्राने त्याला विकत घेतले आणि त्याच्या ४५ वर्षांच्या भावासोबत तिचं लग्न केलं. महिनाभरानंतर त्या माणसाने तिला चित्राच्या घरी सोडले. इथे चित्राच्या मुलाने तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली.

कशी बचावली पीडित तरुणी?

चित्रा घरी असताना एके दिवशी मुलीच्या हातात तिचा मोबाईल आला. मुलीने तातडीने आईला फोन करून माहिती दिली आणि ती कुठे आहे हे सांगितले. तर दुसरीकडे पश्चिम बंगाल पोलिसांना तरुणीच्या मोबाईलचे लोकेशन बिहारमध्ये सापडले. त्यानंतर या सर्व घटनेचा उलगडा झाला.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख