मटा ऑनलाइन वृत्त । बेळगाव
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलात हवालदार म्हणून सेवा बजावणारे खानापूर तालुक्यातील बैलूर गावचे बसाप्पा बजंत्री शहीद झाले. सोमवारी श्रीनगर येथील पंत चौकात दहशतवाद्यांनी ट्रकवर हल्ला केला होता. हल्ल्यात जखमी झालेल्या बसप्प्पा यांना उपचारासाठी दवाखान्यात त्वरित हलविण्यात आले होते पण तेथे उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त बैलूर येथे कळताच बैलूरसह खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
बसाप्पा बजंत्री यांची पोटनिवडणुकीसाठी संवेदनशील भागात नेमणूक करण्यात आली होती. बजंत्री यांच्यासह केंद्रीय राखीव दलाचे सहा पोलीस आणि दोन नागरी कर्मचारी ट्रकमधून निघाले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला.
बसाप्पा बजंत्री यांचे पार्थिव दिल्लीहून गोव्याला विमानाने आणण्यात आले. गोव्याहून पार्थिव खानापूरला आणण्यात आले. खानापूर येथे तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना अभिवादन केले. रात्री पार्थिव बैलूरला पोचले असून बुधवारी लष्करी इतमामात बसाप्पा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.