अ‍ॅपशहर

रेल्वे, विमानतळे, बस थांब्यांवर ‘कुल्हड’मधून चहा?

​एकीकडे पंतप्रधान मोदींनी 'प्लास्टिकमुक्त भारत' मोहिमेची घोषणा केली असतानाच देभरातील महत्त्वाची जवळपास १०० रेल्वे स्थानके, विमानतळ, मॉल, बस डेपोंमधील स्टॉल अशा ठिकाणी यापुढे 'कुल्हड'मधून (मातीचे भांडे) चहा देणे बंधनकारक होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स 26 Aug 2019, 4:00 am
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kulhad-tea


एकीकडे पंतप्रधान मोदींनी 'प्लास्टिकमुक्त भारत' मोहिमेची घोषणा केली असतानाच देभरातील महत्त्वाची जवळपास १०० रेल्वे स्थानके, विमानतळ, मॉल, बस डेपोंमधील स्टॉल अशा ठिकाणी यापुढे 'कुल्हड'मधून (मातीचे भांडे) चहा देणे बंधनकारक होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय वाहतूक तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून, त्याबाबत त्यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्रही लिहिले आहे. सध्या फक्त वाराणसी आणि रायबरेली या रेल्वे स्थानकांतील खनपान सेवा पुरवठादाराकडून मातीपासून बनवलेले कप, पेले आणि बश्या वापरल्या जात आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज