अ‍ॅपशहर

'नोटाबंदीच्या मृत्यूंचा मोदींना शाप लागेल'

नोटाबंदीनंतर झालेल्या मृत्यूंवरून केंद्र सरकारला लक्ष्य करणाऱ्या विरोधकांना आता द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांची साथ मिळाली आहे. शंकराचार्य सरस्वती यांनी पंतप्रधान मोदी यांना थेट लक्ष्य केलं आहे. 'मोदी यांची राजवट इंग्रजांपेक्षाही बत्तर आहे, असा आरोप करतानाच, 'नोटाबंदीमुळं होत असलेल्या मृत्यूंचा मोदींना शाप लागेल,' असं भाकीत सरस्वती यांनी वर्तवलं आहे.

Maharashtra Times 19 Nov 2016, 12:30 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नरसिंहपूर (मध्य प्रदेश)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम currency ban modi will have to pay for deaths of people
'नोटाबंदीच्या मृत्यूंचा मोदींना शाप लागेल'

नोटाबंदीनंतर झालेल्या मृत्यूंवरून केंद्र सरकारला लक्ष्य करणाऱ्या विरोधकांना आता द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांची साथ मिळाली आहे. शंकराचार्य सरस्वती यांनी पंतप्रधान मोदी यांना थेट लक्ष्य केलं आहे. 'मोदी यांची राजवट इंग्रजांपेक्षाही बत्तर आहे, असा आरोप करतानाच, 'नोटाबंदीमुळं होत असलेल्या मृत्यूंचा मोदींना शाप लागेल,' असं भाकीत सरस्वती यांनी वर्तवलं आहे.

काँग्रेसच्या जवळचे मानले जाणारे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती धार्मिक व राजकीय विषयांवर अनेकदा बेधडक मतं मांडत असतात. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथेही त्यांनी देशातील सध्याच्या घडामोडींवर आपलं परखड मत मांडलं. 'मोदींनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. मोदी हे सेवक नसून खलनायक आणि हुकूमशहा आहेत. स्वातंत्र्यापासूनचे हिशेब तपासणार असल्याचं सांगून ते लोकांना धमकवताहेत. हिशेब घेण्याचं काम कायद्याचं आहे. मोदी कोण लागून गेले हिशेब मागणारे? हा देश मोदींच्या कार्यपद्धतीनं नव्हे, तर राज्यघटनेनुसार चालेल,' असं शंकराचार्य म्हणाले.

'सर्वांनाच लबाड ठरवंल जाऊ शकत नाही. हे सरकार वित्त व जीविताचं रक्षण करण्याऐवजी लोकांचे जीव आणि वित्त काढून घेत आहे. रांगा लावायला भाग पाडून लोकांना दु:खी करणं ही लोकशाही नाही,' असंही ते म्हणाले. नोटाबंदीमुळं होणाऱ्या कथित मृत्यूंबद्दल त्यांनी मोदींना जबाबदार धरले. या सर्वाचा मोदींना शाप लागेल, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज