अ‍ॅपशहर

लखनऊतील ऑक्सिजन प्लांटमध्ये भीषण स्फोट, ३ ठार तर ७ जखमी

ऑक्सिजनचा मोठा तुटवडा असताना लखनऊमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. ऑक्सिजन प्लांटमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ७ जखमी झाले आहेत. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 May 2021, 7:05 pm
लखनऊः उत्तर प्रदेशात राजधानी लखनऊमध्ये मोठा दुर्घटना घडली. लखनऊच्या देवा रोडवरील केटी ऑक्सिजन प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात ३ जण ठार झाले आहेत. तर ७ जण जखमी झालेत. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणी जिल्हाधिकारी अभिषेक प्रकाश यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वात ४ सदस्यांची समिती नेण्यात आली आहे. यात अग्निशमन दलाचे अधिकारी आणि औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम blast in oxygen plant
लखनऊतील ऑक्सिजन प्लांटमध्ये भीषण स्फोट, ३ ठार तर ७ जखमी


... यापेक्षाही अधिक भीषण स्फोट झाला असता

दुर्घटनेवेळी प्लांटच्या बाहेर शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंगसाठी नागरिकांनी ही गर्दी केली होती. स्फोट इतका मोठा होता की ऑक्सिजन रिफिलिंग दरम्यान तरुणाचा हातच उडाला. यावेळी घटनस्थास्थळी असलेले इतर अनेक जणांना गंभीर दुखपत झाली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

उत्तर प्रदेशत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. ऑक्सिजनची सर्वाधिक मागणी लखनऊमधून होतेय. हजारोंच्या संख्येत रुग्णांचे नातेवाईक हे ऑक्सिजन सिलिंडरच्या रिफिलिंगसाठी ऑक्सिजन प्लांटवर येत आहेत. ऑक्सिजन प्लांट बाहेर लांबच लांब रांगा लागत आहेत. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.

coronavirus : सावधान! देशात करोनाची तिसरी लाट येणार, शास्त्रज्ञांनी दिला इशारा

यूपीत २.७२ लाख रुग्णांवर उपचार

उत्तर प्रदेशात आतापर्यंत एकूण १३ लाख ६८ हजारांहून अधिक नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी १० लाख ८१ जण करोनामुक्त झाले आहेत. २.७२ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर १३ हजार ७८९ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

Gujarat: नियम गेले पाण्यात! करोनाला पळवण्यासाठी जलाभिषेक, महिलांची गर्दी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज