अ‍ॅपशहर

गुजरातच्या बदबूसाठी अमिताभना यांना निमंत्रण

गुजरातमधील उना दलित अत्याचारविरोधी समिती ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना 'अनोखे' निमंत्रण पाठवून सरकारविरोधातील आपला रोष व्यक्त करणार आहे. 'बदबू गुजरात की' असा संदेश असलेले पत्र आता अमिताभ यांना पाठवण्यात येणार आहेत. तसंच गुजरातमधील दुर्गंधी घेण्यासाठी दलित संघटनेने अमिताभ यांना निमंत्रण दिले आहे.

Maharashtra Times 11 Sep 2016, 12:05 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dalits to invite ambitabh bachchan to sample badbu gujarat ki
गुजरातच्या बदबूसाठी अमिताभना यांना निमंत्रण


गुजरातमधील उना दलित अत्याचारविरोधी समिती ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना 'अनोखे' निमंत्रण पाठवून सरकारविरोधातील आपला रोष व्यक्त करणार आहे. 'बदबू गुजरात की' असा संदेश असलेले पत्र आता अमिताभ यांना पाठवण्यात येणार आहेत. तसंच गुजरातमधील दुर्गंधी घेण्यासाठी दलित संघटनेने अमिताभ यांना निमंत्रण दिले आहे. अमिताभ बच्चन हे गुजरातच्या पर्यटन विभागाचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत. 'खुशबू गुजरात की' आणि 'कुछ दिन तो गुजारीए गुजरात में' असे ते जाहिराती म्हणतात. हाच धागा पकडून दलितांनीही बच्चन यांना दुर्गंधी घेण्याचे निमंत्रण दिले आहे.

'येत्या १३ तारखेला एक बैठक बोलवण्यात आली आहे. यात हजारो दलित कुटुंब अमिताभ यांना पत्र लिहितील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विनंतीवरून अमिताभ यांनी 'खुशबू गुजरात की' ही जाहिरात केली. आता दलितांनी मेलेली जनावरं उचलण्याचं बंद केलं आहे. यामुळे गुजरातमध्ये काही दिवस राहून 'बदबू गुजरात की'चा अमिताभ यांनी लाभ घ्यावा', असं निमंत्रण देत संतप्त भावना दलित संघटनेचे संयोजक जिग्नेश मेवानी यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज