अ‍ॅपशहर

महिलांनी वरातीला जाणं इस्लामविरोधी: दारुल

लग्न समारंभात स्त्री-पुरुषांनी एकत्र जेवणं हे इस्लामविरोधी आहे, असा काही दिवसांपूर्वीच फतवा काढणाऱ्या दारुल उलूम देवबंदनं नवा फतवा काढला आहे. लग्नाच्या वरातीत महिलांनी सहभागी होणे इस्लामविरोधी असल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Dec 2018, 6:18 pm
सहारनपूर:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम darul uloom deoband issues fatwa which says muslim women cannot go in baarat
महिलांनी वरातीला जाणं इस्लामविरोधी: दारुल


काही दिवसांपूर्वीच लग्न समारंभात स्त्री-पुरुषांनी एकत्र जेवणं हे इस्लामविरोधी आहे, असा फतवा काढून चर्चेत राहिलेल्या 'दारुल उलूम देवबंद'नं नवा फतवा काढला आहे. लग्नाच्या वरातीत महिलांनी सहभागी होणे इस्लामविरोधी असल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे.

लग्नासाठी नवरदेव वरात घेऊन निघाल्यानंतर त्यात नाचगाणं होतं. कुटुंबीय आणि नातेवाईकांसह ओळखीतल्या महिलाही त्यात सहभागी होतात. अशा वरातीला शरीयत मान्यता देतं का, असा प्रश्न फुलासी येथील रहिवासी नजम गौड यानं दारुल उलूम देवबंदला विचारला होता. त्यावर संस्थेनं नवीन फतवा काढला आहे. वरातीत महिलांनी सहभागी होणे इस्लामविरोधी आहे. वरातीत महिला आणि पुरुषांनी एकत्रित सहभागी होणे टाळावे. नववधूच्या पाठवणीवेळी घरातील दोन किंवा तीन सदस्यांनीच जावे, असं या फतव्यात म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज