अ‍ॅपशहर

अशी औलाद नसलेली बरी! वडिलांवर अंत्यविधी करण्यासाठी मुलाची संतापजनक अट; लेकीनं दिला मुखाग्नी

daughter does last rites: जिवंत असताना वडिलांना यातना दिल्या. वडिलांच्या अंत्यदर्शनालाही आला नाही. कुटुंबानं अंत्यविधीसाठी बोलावल्यावर मुलानं त्यासाठी संतापजनक अट ठेवली. त्यामुळे मृताच्या लेकीनं वडिलांवर अंत्यसंस्कार केले.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Feb 2023, 12:33 pm
अमरावती: आई, वडिलांच्या पार्थिवाला मुलगा मुखाग्नी देतो अशी प्रथा आहे. मात्र आता अनेक ठिकाणी मुलीदेखील आई, वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देतात. समाज पुढारलेला आहे. काही मातापित्यांना फक्त मुलगीच असते. त्यामुळे मुलीच आई, वडिलांच्या मृतदेहाला मुखाग्नी देतात. मात्र आंध्र प्रदेशात एक वेगळी घटना घडली आहे. ही घटना वाचून कदाचित तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम last riots


वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यासाठी मुलानं संतापजनक अट घातली. मला पैसे द्या, तरच वडिलांच्या मृतदेहाला अग्नी देतो, अशी मागणी मुलानं केली. त्यामुळे मृताच्या लेकीनं पार्थिवाला अग्नी दिला. एनटीआर जिल्ह्यातील पेनीगंचीप्रोलु येथील अनिगंडलापाडू गावात वास्तव्यास असलेल्या गिंजुपल्ली कोटायह (८०) यांचं निधन झालं.
तास उलटून गेला, एकजण माडावर हालचाल न करता बसलाय; पादचाऱ्याचा पोलिसांना फोन अन् मग...
गिंजुपल्ली आणि त्यांच्या मुलामध्ये संपत्तीवरून सातत्यानं वाद व्हायचे. गिंजुपल्ली यांना जमीन विकून १ कोटी रुपये मिळाले होते. त्यातील ७० लाख रुपये त्यांनी मुलाला दिले, तर ३० लाख रुपये स्वत:कडे ठेवले. मात्र मुलाला उर्वरित ३० लाख रुपयेदेखील हवे होते. त्यासाठी तो वडिलांना सतत त्रास द्यायचा. पैसे न दिल्यास ठार करेन, अशा धमक्यादेखील मुलानं गिंजुपल्ली यांना दिल्या होत्या. त्यानं वडिलांवर शारीरिक अत्याचारही केले.

मुलाच्या त्रासाला कंटाळून गिंजुपल्ली त्यांची मुलगी विजयालक्ष्मीच्या घरी गेले. विजयालक्ष्मी गुम्माडिडुरु गावात वास्तव्यास आहे. गिंजुपल्ली आणि त्यांची पत्नी अनेक महिन्यांपासून मुलीकडेच राहत होते. काही दिवसांपासून गिंजुपल्ली यांची प्रकृती बिघडत होती. मात्र मुलाला त्यांची काळजी नव्हती. आजारी वडिलांची सर्व देखभाल विजयालक्ष्मीनं केली. गिंजुपल्ली यांच्या निधनाची माहिती कुटुंबातील सदस्यांनी मुलाला दिली. मात्र त्यानं वडिलांचा मृतदेह स्वत:च्या घरी नेण्यास आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.
हळद लागली, नवरी सजली; आंघोळीला गेली, ती बाहेर आलीच नाही; कुटुंबीयांनी दार ठोठावलं तर...
गिंजुपल्ली यांच्याकडे असलेली उर्वरित रक्कम दिली तरच त्यांच्यावर अंत्यविधी करेन, त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देईन, अशी संतापजनक अट त्यानं कुटुंबीयांसमोर ठेवली. पैसे मिळत नसतील तर वडिलांच्या अंत्यदर्शनालादेखील येणार नाही, असं मुलगा म्हणाला. त्यामुळे कुटुंबासमोर पर्याय शिल्लक राहिला नाही. विजयालक्ष्मीनं वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि अंत्यविधी केले.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख