अ‍ॅपशहर

कर्जात बुडलेल्या सट्टेबाजाचे मोदींना साकडे!

पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणी कोणी साकडं घालावं? चक्क एका सट्टेबाजानं आपल्याला वाचवा अशी याचना मोदींकडे केली आहे. क्रिकेटमध्ये सट्टा लावून लाखो रुपये हरल्यानंतर या सट्टेबाजाला कर्ज देणाऱ्यांनी धमकवायला सुरुवात केली, तेव्हा या पठ्ठ्यानं सरळ आपल्या जीवाला धोका असल्याचं मोदींना सांगणारा एक व्हिडिओच तयार केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राजकोट पोलिसांनी या सट्टेबाजाच्या घरी सुरक्षा पुरवली आहे.

Maharashtra Times 24 Apr 2017, 12:09 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम debt ridden from gambling man pleads with pm for help
कर्जात बुडलेल्या सट्टेबाजाचे मोदींना साकडे!

पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणी कोणी साकडं घालावं? चक्क एका सट्टेबाजानं आपल्याला वाचवा अशी याचना मोदींकडे केली आहे. क्रिकेटमध्ये सट्टा लावून लाखो रुपये हरल्यानंतर या सट्टेबाजाला कर्ज देणाऱ्यांनी धमकवायला सुरुवात केली, तेव्हा या पठ्ठ्यानं सरळ आपल्या जीवाला धोका असल्याचं मोदींना सांगणारा एक व्हिडिओच तयार केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राजकोट पोलिसांनी या सट्टेबाजाच्या घरी सुरक्षा पुरवली आहे.

दीपक धनानी असे या सट्टेबाजाचे नाव आहे. 'कर्ज फेडता न आल्याने काही सट्टेबाज आणि काही गुंड मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत', असे दीपक याने व्हिडिओत म्हटले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून धनानी मात्र गायब झाला आहे.

व्हिडिओत धनानी म्हणतो, 'नमस्ते नरेंद्र मोदी साहेब, नमस्ते राजकोट शहर पोलीस आयुक्त. माझे नाव दीपक जमनादास धनानी आहे. राजकोट आणि अन्य शहरांतले सट्टेबाज आणि अपराधी मला ठार मारण्याची धमकी देत आहेत. मी चिंतेत आहे. माझी चूक झाली, मला मान्य आहे. मी या लोकांचं कर्ज फेडायला जेवढं कमवलं ते सर्व दिलं. घर विकलं. ५ ते ७ कोटी रुपये फेडले. अजून ७० लाख द्यायचे आहेत. पण आता माझ्याकडे काहीही नाही. हे लोक माझ्या घरी येऊन मला आणि आई-वडिलांना मारण्याची धमकी देऊन गेले आहेत.'

राजकोटच्या मालवीयनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आर. आर. सोलंकी यांनी सांगितले की धनानीच्या कुटुंबाला सुरक्षा दिली आहे. एफआयआरनंतर पुढची कार्यवाही होईल. धनानी बुकी आहे, त्याला यापूर्वीही क्रिकेटवर सट्टा लावल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज