अ‍ॅपशहर

'हिंदू नेते झाल्याबद्दल केजरीवाल यांचे खूप खूप अभिनंदन'

दिल्लीत करोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत आहे. करोनाचे शेकडो नवीन रुग्ण आढळून येत आहेत. तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिवाळीनिमित्त अक्षरधाम मंदिरात सपत्नीक पूजा केल्याने त्यांच्यावर टीका होतेय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Nov 2020, 10:28 pm
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( arvind kejriwal ) यांना जुन्या साथीदारांनी टीकेचं लक्ष्य केलं आहे. दिवाळीनिमित्त दिल्लीतील अक्षरधाम मंदिर पूजा करणं आणि यासाठी सर्व दिल्लीकरांना एकत्र येण्याचं आवाहन आणि या पूजेचं वृत्त वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करण्यावरून केजरीवाल यांच्यावर टीका होतेय. आम आदमी पक्षाचे माजी सदस्य आणि चांदणी चौक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आशुतोष ( ashutosh ) यांनी दिवाळी पूजेवरून केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arvind kejriwal
'हिंदू नेते झाल्याबद्दल केजरीवाल यांचे खूप खूप अभिनंदन'


दिवाळीनिमित्त दिल्लीकरांना एकत्र पूजा करण्यासाठी टीव्हीवर जाहिरात देणं आणि या पूजेचे थेट प्रक्षेपण करण्याच्या मुद्द्यावर रविवारी आशुतोष यांनी केजरीवालांवर टीका केली. 'हिंदू नेते झाल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांचे खूप खूप अभिनंदन' असं ट्विट करत आशुतोष यांनी केजरीवाल यांना टीकेचं लक्ष्य केलं.

२०१४ मध्ये आम आदमी पक्षासाठी लोकसभा निवडणुका लढल्यानंतर आशुतोष यांनी २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती. यानंतर त्यांनी दिल्ली प्रदेशचीही जबाबदारी सांभाळली आणि २०१७ मध्ये ‘आप’ने दिल्ली महापालिका निवडणुका त्यांच्या नेृत्वात लढवल्या. पण ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांनी वैयक्तीक कारणांमुळे आम आदमी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता.

केजरीवाल यांनी दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात शनिवारी दिवाळीनिमित्त पूजा केली. यावेळी पत्नी सुनीता यांच्यासह उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही उपस्थित होते. वाहिन्यांवर या पूजेचं थेट प्रक्षेपण केलं गेलं.

याआधी, दिल्लीतील प्रदूषणाविरूद्धच्या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या केजरीवाल यांनी दिल्लीतील रहिवाशांना वाहिन्यांवरील थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून पूजामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची प्रकृती बिघडली, आयसीयूमध्ये उपचार

'४० जागा जिंकून नितीशकुमार मुख्यमंत्री कसे होऊ शकतात?'

त्यांनी हिंदीमध्ये ट्विट केलं होतं. 'दिल्लीचे दोन कोटी नागरिक एकसाथ दिवाळीची पूजा करतील आणि आज संध्याकाळी ७.३९ वाजता मंत्रोच्चार करतील. याचे थेट प्रक्षेपण केलं जाईल. चला, आपण दिल्लीच्या दिवाळीचा एक भाग होऊया, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज