अ‍ॅपशहर

भाजप-आप संघर्ष शिगेला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ रेसकोर्स निवासस्थानी मोर्चा घेऊन निघालेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया व इतर आमदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मोदी सरकार दिल्ली सरकार व ‘आप’च्या नेत्यांना विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप करत शिसोदिया हे मोदींसमोर शरणागतीसाठी निघाले होते.

Maharashtra Times 26 Jun 2016, 1:36 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम delhi deputy cm manish sisodia aap mlas stopped near tughlaq road on their way to 7 rcr
भाजप-आप संघर्ष शिगेला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ रेसकोर्स निवासस्थानी मोर्चा घेऊन निघालेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया व इतर आमदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मोदी सरकार दिल्ली सरकार व ‘आप’च्या नेत्यांना विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप करत शिसोदिया हे मोदींसमोर शरणागतीसाठी निघाले होते.

दिल्लीतील गाझीपूर भाजी बाजार संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र गोस्वामी आणि अन्य व्यापाऱ्यांनी सिसोदिया यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, या तक्रारीमागे पंतप्रधान मोदी व भाजपचा हात असल्याचा शिसोदिया यांचा आरोप आहे. आमदार दिनेश मोहनिया यांच्यावर शनिवारी झालेली कारवाई हाही भाजपचाच डाव असल्याचा ‘आप’चा आरोप आहे. ‘आप’च्या नेत्यांवरील या कारवाईचा निषेध म्हणून मनीष शिसोदिया आज पंतप्रधान मोदींसमोर शरणागती पत्करणार होते. तसं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरून जाहीर केलं होतं. 'मोदी जी! तुमचं भांडण आमच्याशी आहे. आम्हाला अटक करा. पण दिल्लीची कामं थाबंवू नका. आम्ही सगळेच तुम्हाला शरण येत आहोत,’ असं ट्विटही ‘आप’नं केलं होतं.

मोदी जी! आपकी हमसे दुश्मनी है, हमें गिरफ्तार कर लो पर दिल्ली के काम मत रोको। हम सब आपके समक्ष सरेंडर करने आ रहे हैं। https://t.co/Fp7mDi4y7V — Manish Sisodia (@msisodia) June 26, 2016 ठरल्याप्रमाणे आज शिसोदिया व ‘आप’चे आमदार ‘७ रेसकोर्स’कडे निघाले. मात्र, त्याआधीच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ७ रेसकोर्स परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. पोलिसांनी शिसोदिया व त्यांच्या सहकारी आमदारांना तुघलक रोडवरच रोखले आणि ताब्यात घेतले. ‘आप’चे ५२ आमदार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, अशी माहिती दिल्लीचे पोलीस सहआयुक्त एम. के. मीना यांनी दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज