अ‍ॅपशहर

दिल्ली पोलिसांनी केली ३ दहशतवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने इस्लामिक स्टेट जम्मू-काश्मीर (ISJK)च्या तीन दहशतवाद्यांना काल अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2018, 4:30 pm
नवी दिल्ली :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम terrorsit


दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने तीन दहशतवाद्यांना काल अटक केली आहे. हे दहशतवादी इस्लामिक स्टेट जम्मू-काश्मीर (ISJK)चे असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

दिल्ली पोलिसांनी मंगळवारीच दिल्लीत दोन अतिरेकी घुसल्याची खबर दिली होती. या अतिरेक्यांची छायाचित्रेही पोलिसांनी जारी केली होती. मात्र हे अटक झालेले अतिरेकी तेच आहेत का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हे दहशतवादी दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्यांच्या मनसुब्याने घुसले होते. अलर्टनंतर पोलीस गेस्ट हाऊस, हॉटेलांसह अनेक ठिकाणी तपासणी करत होते. जिथे परदेशी नागरिक मोठ्या संख्येने येतात अशी ठिकाणे पोलिसांच्या रडारवर होती. मंगळवारीच दिल्लीत हिज्बुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक इम्तियाज अहमदची हत्या झाली होती. अहमद यांची हत्या करणारा अंसार उल हक या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने अटक केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज