अ‍ॅपशहर

विद्यार्थ्यांनी वर्गातच शिक्षकाला भोसकलं

शाळेतून काढून टाकलं म्हणून दोन विद्यार्थ्यांनी वर्गातच शिक्षकाला चाकूनं भोसकलं. यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचा मृत्यू झाला. पश्चिम दिल्लीतील नांगलोई येथील सरकारी शाळेत सोमवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे.

Maharashtra Times 27 Sep 2016, 10:47 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम delhi teacher dies after 2 students stab him in class
विद्यार्थ्यांनी वर्गातच शिक्षकाला भोसकलं


शाळेतून काढून टाकलं म्हणून दोन विद्यार्थ्यांनी वर्गातच शिक्षकाला चाकूनं भोसकलं. यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचा मृत्यू झाला. पश्चिम दिल्लीतील नांगलोई येथील सरकारी शाळेत सोमवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. अर्थशास्त्राच्या पेपरची वेळ साडेपाचला संपली. शिक्षक मुकेश कुमार यांनी विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिका घेतल्या. त्याचवेळी अचानक काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर चाकूने सपासप वार करून पसार झाले. यात गंभीर झालेल्या मुकेश कुमार यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शाळेतून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी वारंवार शाळेला 'दांडी' मारत होते. त्यांना कारवाईबाबत लेखी आणि तोंडी सूचनाही दिल्या होत्या. मात्र, तरीही दोघे शाळेत येत नव्हते. ते विद्यार्थी बदला घेण्याबाबत बोलत होते, असं त्यांच्या मित्रांनी सांगितलं. हल्लेखोर विद्यार्थ्यांपैकी एक जण गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज