अ‍ॅपशहर

दिल्ली हिंसाः भाजप नेत्यांवर FIR दाखल होण्याची शक्यता

राजधानी दिल्लीतील हिंसाचारावरून दिल्ली हायकोर्टाने कठोर भूमिका घेतलीय. प्रक्षोभक भाषण देणाऱ्या नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करा, असे आदेश हायकोर्टाने दिल्ली पोलिसांना दिलेत. यामुळे भाजप नेते अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा आणि परवेश वर्मा यांच्यावर एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Feb 2020, 7:51 pm
नवी दिल्लीः राजधानी दिल्लीतील हिंसाचारावरून दिल्ली हायकोर्टाने कठोर भूमिका घेतलीय. प्रक्षोभक भाषण देणाऱ्या नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करा, असे आदेश हायकोर्टाने दिल्ली पोलिसांना दिलेत. यामुळे भाजप नेते अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा आणि परवेश वर्मा यांच्यावर एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे. अनुराग ठाकूर हे केंद्रीय मंत्री आहेत, परवेश वर्मा हे पश्चिम दिल्लीचे भाजपचे खासदार आहेत. तर कपिल मिश्रा हे भाजपचे नेते आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kapil-mishra


सीएएवरून झालेल्या हिंसाचारासंबंधी भाजपच्या तीन नेत्यांच्या कथित प्रक्षोभक भाषणांची तपासणी करून निर्णय घ्या. आणि उद्यापर्यंत कोर्टाला यासंबंधी माहिती कळवा, असं हायकोर्टाने पोलिसांना सांगितलंय. या प्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. प्रक्षोभक भाषण करणाऱ्या नेत्यांवर आधी कारवाई का झाली नाही? यावेळी दिल्लीतील १९८४ च्या दंगलीसारखं वातावरण होऊ देणार नाही, अशी टिप्पणी हायकोर्टाने केली. यावेळी हायकोर्टात भाजपच्या तीनही नेत्यांच्या भाषणाचे व्हिडिओ दाखवण्यात आले. यावरून दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.

दिल्ली हिंसाचारः अखेर PM मोदींनी मौन सोडलं, पाहा काय म्हणाले मोदी

दिल्ली हिंसाचार: नाल्यात आढळले 'आयबी' अधिकाऱ्याचे...

कपिल मिश्रांनी मौजपूरमध्ये दिले होते प्रक्षोभक भाषण

भाजप नेते कपिल मिश्रा यांनी २३ फेब्रुवारीला मौजपूर मेट्रो स्टेशनजवळ सीएए समर्थनार्थ रॅली काढली होती. या रॅलीत मिश्रा यांनी प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. यासंबंधी सोशल मीडियावर ट्विटही करण्यात आलं होतं. हायकोर्टात मिश्रा, ठाकूर आणि वर्मांविरोधात याचिका करण्यात आली आहे. तिन्ही नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आलीय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून उफाळलेल्या हिंसेत आतापर्यंत ईशान्य दिल्लीत २२ जणांचा मृत्यू झालाय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज