अ‍ॅपशहर

दिल्ली हिंसा: कपिल मिश्रांना अटक करण्याची मागणी

दिल्लीच्या इशान्य भागात हिंसा भडकवल्याप्रकरणी भाजप नेते कपिल मिश्रा यांना अटक करण्याची मागणी जामिया समन्वय समितीनं सोमवारी केली आहे. पोलिस मुख्यालयाबाहेर निदर्शनाच्या पवित्र्यात असणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांबोत झालेल्या बैठकीनंतर निझामुद्दीन इथे जाण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2020, 9:17 am
नवी दिल्लीः दिल्लीच्या इशान्य भागात हिंसा भडकवल्याप्रकरणी भाजप नेते कपिल मिश्रा यांना अटक करण्याची मागणी जामिया समन्वय समितीनं सोमवारी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kapil-mishra


समितीनं पोलिस मुख्यालयाबाहेर दिल्लीतील हिंसाचाराविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलनाचा पवित्रा मागे घेत पोलिसांसमोर काही मागण्या ठेवल्या. कपिल मिश्रा यांनी त्यांच्या भाषणातून व ट्वीटच्या माध्यमातून दिल्लीतील इशान्य भागात हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर एफआयआर दाखल करुन तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसंच, दिल्लीतील ज्या २० ठिकाणी सीएएविरोधात सुरु असणाऱ्या आंदोलन स्थळांवरील सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. यामध्ये शाहीन बाग, जामिया मिलिया इस्लामिया, मुस्तफाबाद, तुर्कमान गेट, खुरेजी, जामा मस्जिद, जाफराबाद मेट्रो स्टेशन यांचा समावेश आहे.

दिल्लीतील हिंसाचारात ४ ठार, शहांनी घेतली बैठक

ईशान्य दिल्लीतील जाफराबादमध्ये सुरू असलेल्या हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी उच्चस्तरीय पातळीवर विचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून तातडीची बैठक घेतली. तर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं केंद्रीय गृहसचिव ए. के. बल्ला यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज