अ‍ॅपशहर

दंगलीनंतरची दिल्ली Live: आतापर्यंत ६३० लोकांना अटक

ईशान्य दिल्लीतील हिंसाचारानंतर तेथील जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे. शनिवारी सकाळी मौजपूर आणि जाफराबादमध्ये लोक रस्त्यांवर दिसू लागले आहेत. तथापि, या सर्व भागांमध्ये पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. पाहा, अपडेट्स...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Feb 2020, 5:37 pm
नवी दिल्ली: ईशान्य दिल्लीतील हिंसाचारानंतर तेथील जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे. शनिवारी सकाळी मौजपूर आणि जाफराबादमध्ये लोक रस्त्यांवर दिसू लागले आहेत. तथापि, या सर्व भागांमध्ये पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. पाहा, अपडेट्स...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम दंगलीनंतरची दिल्ली


lIVE अपडेट्स...

>> ईशान्य दिल्लीच्या डीएम कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पोहोचले.... पीडितांना वितरित करणार चेक

>> हिंसाचार थांबल्यानंतर ईशान्य दिल्लीत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर


>> दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांची भेट


>> दिल्लीत काही लोक द्वेष पसरवण्याचे काम करत असल्याचे स्पष्ट. कुणाला तसे मेसेज मिळाल्यास त्याची माहिती दिल्ली सरकारला द्यावी, दिल्ली सरकार अशी प्रकरणे पोलिसांकडे देईल, असे दिल्ली सरकारचे आवाहन. अशा तक्रारी करण्याती व्हॉट्सअॅप नंबर जारी करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय.

>> ईशान्य दिल्लीत जनजीवन हळूहळू होतेय पूर्ववत. ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त.... दंगलग्रस्त भागात कलम १४४ लागू. पाहा... शिवविहार परिसरातील काही दृश्ये



>> दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेणार

>> मौजपूर येथे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शनिवारी सकाळी दुकाने बंद होती, परंतु ई-रिक्षा रस्त्यांवर दिसल्या. (फोटो- सचिन त्रिवेदी)

>> मौजपूर चौकात आजही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (फोटो- सचिन त्रिवेदी)

>> ईशान्य दिल्लीतील हिंसाचार प्रकरणात एकूण ६३० लोकांना अटक केली आहे. तर या प्रकरणी एकूण १४८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

>> दंगलीबाबतचे उपलब्ध असलेले व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फूटेज तपासणीचे काम सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

>> दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचारावर नियंत्रण आले असून दंगलग्रस्त भागात जनजीवन पूर्ववत होत आहे. मात्र, सर्व दंगलग्रस्त भागांमध्ये पोलिस तैनात आहेत. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत शांतता समितीच्या सुमारे ४०० बैठका घेतल्या आहेत.

>> शुक्रवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचारात मृतांची संख्या ४२ झाली. या हिंसाचारात २५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. प्रामुख्याने झाफराबाद, मौजपूर, चांदबाग, खुरेजी खास आणि भजनपुरा या भागांत मोठे नुकसान झाले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज