अ‍ॅपशहर

दिल्ली दंगल: रिक्षा ओढणाऱ्यांची ही कहाणी डोळ्यात आणते पाणी

ईशान्य दिल्लीत उसळलेल्या दंगलीमध्ये शेकडो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. हिंदू-मुस्लिम, श्रीमंत, गरीब, दुकानदार आणि रिक्षाचालक असे सर्वच या हिंसाचाराचे शिकार बनले. दिल्लीत अशाच दोन रिक्षा ओढणाऱ्यांची कहाणी तुमच्या डोळ्यात पाणी आणल्यावाचून राहणार नाही. त्यांपैकी एक मुलासाठी दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला असताना दंगलखोरांनी त्याची हत्या केली, तर दुसऱ्याच्या घरालाच आग लावण्यात आली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Mar 2020, 8:45 am
नवी दिल्ली: ईशान्य दिल्लीत उसळलेल्या दंगलीमध्ये शेकडो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. हिंदू-मुस्लिम, श्रीमंत, गरीब, दुकानदार आणि रिक्षा ओढणारे असे सर्वच या हिंसाचाराचे शिकार बनले. दिल्लीत अशाच दोन रिक्षा ओढणाऱ्यांची कहाणी तुमच्या डोळ्यात पाणी आणल्यावाचून राहणार नाही. त्यांपैकी एक मुलासाठी दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला असताना दंगलखोरांनी त्याची हत्या केली, तर दुसऱ्याच्या घरालाच आग लावण्यात आली. या रिक्षा ओढणाऱ्याची पत्नी आणि ४ मुलं मंगळवारपासून बेपत्ता असून हा रिक्षा ओढणारा एका नाल्याच्या किनाऱ्यावर बसून रडत असतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम delhi-violence


गुरुतेग बहादूर हॉस्पिटलमधील (जीटीबी) शवागाराच्या बाहेर बसून रविवारी सुनीता आपल्या दोन लहान मुलांना मांडीवर घेऊन बसत पतीच्या शवविच्छेदनाची वाट पाहत होती. तिचे पती प्रेम सिंह यांची ईशान्य दिल्लीतील हिंसाचारानंतर दंगलखोरांनी हत्या केली. ब्रिजपुरीत राहणारे २७ वर्षीय प्रेम सिंह हे रिक्षा ओढत होते. प्रेम सिंह हे आपल्या मुलांसाठी दूध आणण्यासाठी ते घराबाहेर पडले होते.

सुनीता सांगतात.....'त्या दिवशी काय झाले मला काहीच माहीत नाही. माझ्या नवऱ्याची दंगलीत हत्या करण्यात आली अशी माहिती मला माझ्या शेजाऱ्यांनी दिली. ते मंगळवारी संध्याकाळी सुमारे ७.३० वाजता दुध आणण्यासाठी गेले होते.' हे सांगत असताना सुनीता यांच्या डोळे पाण्याने भरले होते.

प्रेम सिंह यांच्या मृतदेहाची ओळख त्याची बहीण सविता यांनी केली. दुसरे रिक्षा ओढणारे माइनुद्दीन यांचा मृतदेह वेलकम पोलिस ठाण्याजवळ सापडला अशी माहिती सुनीता यांच्या शेजारी निशा यांनी सांगितले. त्यांच्या पत्नीचे नाव संगीता असे आहे.

मोइनुद्दीनचे कुटुंब उद्ध्वस्त झाले

रिक्षा चालक मोइनुद्दीन हे न्यू मुस्तफाबादचे रहिवाशी होते. त्याचे कुटुंबच या दंगलीत उद्ध्वस्त झाले. त्यांच्या घराला आग लावण्यात आली. त्यांच्या घरातील सर्वच बेपत्ता आहेत. ते पत्नी आणि ४ मुलांसोबत राहत होते. २३ फेब्रुवारीला दंगल उसळल्यानंतर माइनुद्दीन यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. त्यांची पत्नी आणि चार मुलांचा काहीच पत्ता लागत नाही. या मुलांमध्ये त्यांच्या १० वर्षीय मुलीचाही समावेश आहे. घर पूर्णपणे जाळल्यामुळे ते आता एका नाल्याच्या किनाऱ्याला रात्र घालवतात.


'माझे कुटुंब कुठे आहे मला माहीत नाही'

माझे कुटुंब कुठे आहे मला माहीत नाही, असे मोइनुद्दीन रडत रडत सांगत होते. ते पुढे म्हणाले, 'जेव्हा इथली परिस्थिती बिघडली तेव्हा सुरक्षित ठिकाणी जा असे मी माझी पत्नी आणि मुलांना सांगितले. तेव्हा पासून त्याचा कुठे पत्ताच लागत नाही. मी पोलिसांना सर्व माहिती दिली आहे. इथली परिस्थिती चांगली झाल्यानंतर काय झाले हे पाहू असे पोलिसांनी मला सांगितले. खूप लोक माझ्या कुटुंबाचा शोध घेत आहेत.'

त्याच दिवशी माइनुद्दीन यांनी २००० रुपयांचे रेशन खरेदी केले होते. मात्र आता सारे काही उद्ध्वस्त झाले आहे. आता मोइनुद्दीन माझ्या दुकानाच्या बाहेर झोपतात अशी माहिती मोइनुद्दीन यांना मदत करणारा दुकारनदार अरुण कुमार यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज