अ‍ॅपशहर

काँग्रेस सर्वात भ्रष्ट पक्ष: भाजपचा पलटवार

नोटाबंदीवरून विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षानेही आपल्या बाह्या सरसावल्या आहेत. विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारची बाजू सावरून धरत काँग्रेसवर प्रतिहल्ला केला आहे. काँग्रेस हा पक्ष देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचे प्रसाद यांनी म्हटले आहे.

Maharashtra Times 27 Dec 2016, 6:38 pm
मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम demonatisation row bjp hits back at congress opposition
काँग्रेस सर्वात भ्रष्ट पक्ष: भाजपचा पलटवार


नोटाबंदीवरून विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षानेही आपल्या बाह्या सरसावल्या आहेत. विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारची बाजू सावरून धरत काँग्रेसवर प्रतिहल्ला केला आहे. काँग्रेस हा पक्ष देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचे प्रसाद यांनी म्हटले आहे.

रविशंकर प्रसाद म्हणाले, ' राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष भ्रष्टाचाराला चिथावणी देणारा पक्ष आहे. देशाला प्रामाणिक बनवण्यासाठी नोटाबंदी करण्यात आली आहे. दहशतवाद, तसेच नक्षलवादाला पायबंद घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींचा राजीनामा का मागितला जात आहे? संपूर्ण देश सरकारच्या बाजूने उभा आहे.'

मोदी सरकारने केलेल्या हल्ल्यात त्रास कोणाला आणि का होत आहे, हे आज विरोधकांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमुळे स्पष्ट झाले असेही प्रसाद म्हणाले. जनतेचा आशिर्वाद आमच्या सोबत आहे असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. भ्रष्ट लोकांचा भ्रष्टाचार उघड होत आहे. पंतप्रधानांनी उचलेल्या या पावलामुळे विरोधी पक्षांना त्रास होत आहे का, या प्रश्नाचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे असे आवाहनही प्रसाद यांनी केले आहे. रोज घोटाळे पकडले जात आहेत, काय यामुळे राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी त्रस्त आहेत का, असा सवालही प्रसाद यांनी उपस्थित केला आहे.

स्वतंत्र भारतात झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यांमध्ये यांचे ( काँग्रेसचे) नाव जोडले गेले आहे असेही प्रसाद म्हणाले. ते पुढे म्हणाले, 'टू जी घोटाळ्याबाबत त्यांनी (राहुल गांधी) मौन का धारण केले याचे उत्तर राहुल गांधींनी आधी द्यावे. कोळसा घोटाळ्यावर ते काहीच कसे बोलले नाहीत?' अर्थमंत्री आणि पंतप्रधान नोटाबंदी या विषयावर बोलायला तयार होते, मात्र विरोधकांनी संसद चालूच दिली नाही असा आरोपही प्रसाद यांनी केला आहे.

विरोधी पक्षांच्या बैठकीला डाव्यांची गैरहजेरी लागल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत 'विरोधकांच्या एकतेचा फुगाही फुटला आहे' असेही प्रसाद पुढे म्हणाले. या स्थितीमुळे काँग्रेसची किती क्षमता आहे याचेही लवकरच दर्शन घडेल असेही प्रसाद म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज