अ‍ॅपशहर

मी बाळासाहेबांना उत्तर देईन!: मोदी

'मी चांगले काम केले आहे. त्यामुळे मी जेव्हा वर जाईन तेव्हा त्याबाबत ठामपणे बाळासाहेबांना उत्तर देऊ शकेन पण तुमची तशी हिंमत होईल का?, असा खरमरीत सवाल विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिवसेना खासदारांची खरडपट्टी काढली.

Maharashtra Times 22 Nov 2016, 2:46 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम demonetization pm narendra modi slams shivsena
मी बाळासाहेबांना उत्तर देईन!: मोदी


'मी चांगले काम केले आहे. त्यामुळे मी जेव्हा वर जाईन तेव्हा त्याबाबत ठामपणे बाळासाहेबांना उत्तर देऊ शकेन पण तुमची तशी हिंमत होईल का?, असा खरमरीत सवाल विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिवसेना खासदारांची खरडपट्टी काढली.

नोटाबंदीमुळे देशात उडालेला गोंधळ, जिल्हा सहकारी बँकांना ५००-१०००च्या नोटा स्वीकारण्यास केलेली मनाई तसेच याबाबत अन्य मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना खासदारांनी आज दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या खास शैलीत त्यांना उत्तर दिलं. मोदींनी थेट बाळासाहेबांबद्दल असलेला आदर व्यक्त करतच या खासदारांना खडेबोल सुनावले. तुम्ही कितीही विरोध केलात तरी तुम्हाला आमच्याबरोबरच राहायचे आहे, असे सांगत पंतप्रधानांनी शिवसेना-भाजप युती टिकून राहण्यासाठी आग्रह धरला.

नोटाबंदीच्या निर्णयाची व्यवस्थित अंमलबजावणी झाली नाही, अशी शिवसेनेची तक्रार आहे. त्यासाठी सेनेने आपल्याच सरकारशी पंगा घेऊन थेट विरोधी पक्षांच्या सुरात सूर मिसळला आहे. त्याचेच पडसाद शिष्टमंडळाच्या मोदीभेटीत दिसले.

उद्धव यांचा मोदींना प्रतिटोला

मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनीही उलट टोला मोदींना लगावला. मोदींच्या या विधानावरून त्यांना बाळासाहेबांबद्दल आदर आहे, हे कळते. त्याबद्दल मी आभारीच आहे परंतु सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देशाचे पंतप्रधान म्हणून आधी त्यांच्याकडून अपेक्षित आहेत. ती उत्तरं जर सर्वसामान्यांना मिळाली आणि त्यांचं जीवन मान सुरळीत झालं तर बाळासाहेबांना जास्त आनंद होईल. शेवटी बाळासाहेब हे सर्वसामान्यांचेच होते, असे उद्धव म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज