इंदूर : भय्यूजी महाराज यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल अटक करण्यात आलेले त्यांचे तीन मदतनीस त्यांना 'नियंत्रणात ठेवण्यासाठी' औषधांचे जादा डोस देत होते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने शनिवारी दिली. भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी त्यांची खासगी सचिव पलक पुराणिक (२५) हिच्यासह विनायक दुधाडे (४२) व शरद देशमुख (३४) या दोघांना अटक केली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक एच. सी. मिश्रा म्हणाले, 'भय्यूजी महाराजांनी आपल्याशी लग्न करावे यासाठी पलक त्यांच्यावर दबाव आणत होती. त्यामुळे ती दुधाडे व देशमुखच्या मदतीने भय्यूजी महाराजांना औषधांचे जादा डोस देत होती. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली होती. भय्यूजी महाराज व पलक यांच्यातील अत्यंत आक्षेपार्ह सोशल मीडिया चॅटचे पुरावे आमच्याकडे आहेत.'
भय्यूजी महाराज आत्महत्या, सचिवासह तीन अटकेत
भय्यूजी महाराज यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल अटक करण्यात आलेले त्यांचे तीन मदतनीस त्यांना 'नियंत्रणात ठेवण्यासाठी' औषधांचे जादा ...
30 20 Jan 2019, 4:00 am