अ‍ॅपशहर

दिग्विजय सिंहांची लायकी नाही: रामदेव

'दिग्विजय सिंह यांना काहीही राजकीय व सामाजिक अस्तित्व उरलेलं नाही. माझ्यावर आरोप करण्याची त्यांची पात्रता नाही,' अशा शब्दांत योगगुरू रामदेव बाबा यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर तोफ डागली आहे.

Maharashtra Times 12 Sep 2017, 3:56 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम digvijay sing has no political or social existence says baba ramdev
दिग्विजय सिंहांची लायकी नाही: रामदेव


'दिग्विजय सिंह यांना काहीही राजकीय व सामाजिक अस्तित्व उरलेलं नाही. माझ्यावर आरोप करण्याची त्यांची पात्रता नाही,' अशा शब्दांत योगगुरू रामदेव बाबा यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर तोफ डागली आहे.

'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख बाबा रामरहीम गुरमीत सिंग याला बलात्कार प्रकरणी अटक झाल्यानंतर देशातील भोंदू बाबांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आखाडा परिषदेनं देशातील १४ स्वयंघोषित अध्यात्मिक गुरूंना ढोंगी बाबा म्हणून जाहीर केलं आहे. आखाडा परिषदेच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना दिग्विजय यांनी रामदेव बाबांनाही या भोंदू म्हणून जाहीर करण्याची मागणी केली होती.

याबद्दल रामदेव बाबांना विचारलं असता त्यांनी दिग्विजय यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 'कुणी कसली यादी जाहीर केली आहे याची मला माहीत नाही. मी कोण आहे हे मला चांगले माहीत आहे. शिवाय, कोण भोंदू आहे हे ठरवण्यास देशातील लोक समर्थ आहेत. मी देशासाठी काम करतोय. दिग्विजय यांच्यासारख्या लोकांच्या प्रश्नांना महत्त्व देत नाही,' असं ते म्हणाले. अवडंबर माजवणाऱ्या, चमत्कार व अंधविश्वासाची भाषा बोलणाऱ्यांना लोकांनी बाबा समजू नये,' असं आवाहनही त्यांनी केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज