अ‍ॅपशहर

न्या. दीपक मिश्रा भारताचे ४५ वे सरन्यायाधीश

न्या. दीपक मिश्रा यांनी आज भारताचे ४५ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मिश्रा यांना राष्ट्रपती भवनातल्या दरबार हॉलमध्ये समारंभपूर्वक शपथ दिली.

Maharashtra Times 28 Aug 2017, 1:53 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dipak misra sworn in as new chief justice of india
न्या. दीपक मिश्रा भारताचे ४५ वे सरन्यायाधीश


न्या. दीपक मिश्रा यांनी आज भारताचे ४५ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मिश्रा यांना राष्ट्रपती भवनातल्या दरबार हॉलमध्ये समारंभपूर्वक शपथ दिली.

भारताचे माजी सरन्यायाधीश जे. एस. खेहर रविवारी निवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्या जागी न्या. दीपक मिश्रा यांनी नियुक्ती करण्यात आली. ६४ वर्षीय मिश्रा हे सर्वोच्च न्यायालयातले सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. ओडिशातून सरन्यायाधीशपदी नियुक्त होणारे मिश्रा हे तिसरी व्यक्ती आहेत. यापूर्वी रंगनाथ मिश्रा आणि जी. बी. पटनायक यांनी सरन्यायाधीशपद भूषवले होते.

मिश्रा यांनी किंवा त्यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने अनेक महत्त्वाचे निर्णय दिले आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातला दोषी याकूब मेमनला फाशीची शिक्षा दिली त्या खंडपीठात न्या. मिश्रा होते. सिनेमागृहांमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी राष्ट्रगीत, निर्भया गँगरेप प्रकरणातल्या दोषींना फाशी आदी निर्णय मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिले आहेत. मिश्रा २ ऑक्टोबर २०१८ रोजी सरन्यायाधीशपदावरून निवृत्त होतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज