अ‍ॅपशहर

कावेरीचं पाणी निवळेचना; तामिळनाडू बंद

कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून गढूळ झालेलं कर्नाटक-तामिळनाडूमधील वातावरण निवळण्यास तयार नाही. कावेरी नदीचं पाणी सोडण्यास टाळाटाळ करण्याच्या कर्नाटक सरकारच्या धोरणाविरोधात आज तामिळनाडूतील विरोधी पक्षांनी बंदची हाक दिली आहे. बंदसाठी रस्त्यावर उतरलेले द्रमुकचे नेते स्टॅलिन व एमडीएमकेचे नेते वायको यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं हा वाद चिघळण्याची चिन्हं आहेत.

Maharashtra Times 16 Sep 2016, 11:36 am
मटा ऑनलाइन वृत्त । चेन्नई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dmks stalin kanimozhi taken in custody
कावेरीचं पाणी निवळेचना; तामिळनाडू बंद

कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून गढूळ झालेलं कर्नाटक-तामिळनाडूमधील वातावरण निवळण्यास तयार नाही. कावेरी नदीचं पाणी सोडण्यास टाळाटाळ करण्याच्या कर्नाटक सरकारच्या धोरणाविरोधात आज तामिळनाडूतील विरोधी पक्षांनी बंदची हाक दिली आहे. बंदसाठी रस्त्यावर उतरलेले द्रमुकचे नेते स्टॅलिन व एमडीएमकेचे नेते वायको यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं हा वाद चिघळण्याची चिन्हं आहेत.

तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुक व भाजप वगळता सर्व विरोधक बंदच्या आंदोलनात उतरले आहेत. तामिळनाडूतील दैनंदिन व्यवहारांवर बंदचा व्यापक परिणाम दिसून येत आहे. राजधानी चेन्नईतील शाळा, महाविद्यालयं, कार्यालयं व दुकानं पूर्णपणे बंद आहेत. ठिकठिकाणी रस्ता व रेल रोको सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बंदमध्ये सहभागी होण्यासाठी उतरलेले द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन, माजी खासदार कनीमोझी व एमडीएमकेचे नेते वायको यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून राज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा हिंसाचार व सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ देऊ नका, असे निर्देश न्यायालयानं कालच दिले होते. मात्र, त्यानंतरही आज बंद सुरूच आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत राहणाऱ्या कन्नड नागरिकांना सुरक्षा देण्याचं आवाहन कर्नाटक सरकारनं केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज