अ‍ॅपशहर

अबब! तरुणाच्या पोटातून काढले ११६ खिळे

​​या जगात कधी काय घडेल काहीच सांगता येत नाही. असाच काहीसा आश्चर्यकारक आणि अनाकलनीय प्रकार राजस्थानात घडलाय. एका रुग्णाच्या पोटातून एक-दोन नव्हे तर ११६ लोखंडाचे खिळे, तारा आणि काडतूसं काढण्यात आली आहे. यशस्वी ऑपरेशन करून डॉक्टरांनी या रुग्णाच्या पोटातून या वस्तू काढल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 May 2019, 3:56 pm
जयपूर:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम doctors removed 116 nails from a mentally retired persons stomach
अबब! तरुणाच्या पोटातून काढले ११६ खिळे


या जगात कधी काय घडेल काहीच सांगता येत नाही. असाच काहीसा आश्चर्यकारक आणि अनाकलनीय प्रकार राजस्थानात घडलाय. एका रुग्णाच्या पोटातून एक-दोन नव्हे तर ११६ लोखंडाचे खिळे, तारा आणि काडतूसं काढण्यात आली आहे. यशस्वी ऑपरेशन करून डॉक्टरांनी या रुग्णाच्या पोटातून या वस्तू काढल्या आहेत.

भोला शंकर (वय ४२) असं या रुग्णाचं नाव आहे. अचानक त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला बुंदी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्याचा एक्स-रे आणि सिटी स्कॅन काढण्यात आला. तेव्हा त्याच्या पोटात खिळे आणि तारा दिसल्या. डॉक्टरांनी लगेचच त्याच्या कुटुंबीयांना सर्जरी करण्यास सांगितले. दीड तास ऑपरेशन करून डॉक्टरांनी भोलाच्या शरीरातील सर्व लोखंडी वस्तू काढल्या आहेत. पण, या वस्तू पोटात गेल्याच कशा? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

भोला २० वर्षांपूर्वी बागकाम करत असे. मात्र त्याची मानसिक स्थिती बिघडल्याने त्याने ते काम सोडून दिले होते, असे भोलाच्या वडिलांनी डॉक्टरांना सांगितले. त्यावरून मानसिक स्थिती बरोबर नसल्याने भोलानेच या लोखंडाच्या गोष्टी खाल्ल्या असतील, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. भोलाच्या पोटातील एक खिळा जवळपास ६.५ इंच लांब होता, अशी माहिती डॉ. अनिल सैनी यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज