अ‍ॅपशहर

धक्कादायक! ३ किलो सोन्याचा 'कंबर पट्टा' घेऊन तो नागपूरला येत होता, पण...

विदेशातून सोन्याची तस्करी करणारे एक रॅकेट महसूल गुप्तचर संचालनालयाने उघड केलं आहे. छत्तीसगडमध्ये डीआरआयने या प्रकरणी केलेल्या कारवाईतून मोठी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jan 2022, 8:30 pm
रायपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI)मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठे यश आले आहे. विदेशातील सोन्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला DRI ने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून जवळपास साडेतीन किलो सोने जप्त करण्यात आले आहे. हा व्यक्ती कोलकात्याहून नागपूरला ट्रेनने निघाला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dri apprehended a man carrying foreign origin smuggled gold by train from kolkata to nagpur
धक्कादायक! ३ किलो सोन्याचा 'कंबर पट्टा' घेऊन तो नागपूरला येत होता! पण...


विदेशातून तस्करी केलेल्या ३.३३ किलो सोन्याची बिस्किटे DRI ने एका व्यक्तीकडून जप्त केली आहे. हा कोलकात्याहून नागपूरला निघाला होता. पण DRI ने त्याला छत्तीसगडच्या रायपूरमध्ये रेल्वे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. ही ३.३३ किलो सोन्याची बिस्किटे त्याने कपड्यामध्ये गुंडाळली होती. कोणाला ही बिस्किटे दिसून येऊ नये म्हणून त्याने कंबर पट्टा बांधतात तसे बांधली होती.
धक्कादायक घटना! घरात आईसह ४ मुलांचे आढळले मृतदेह, काय आहे कारण?...

कस्टम अॅक्ट १९६२ नुसार ही सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात ५ जणांची टोळी असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी विदेशातून सोन्याची तस्करी करण्यात डीआरआयने ताब्यात घेतलेला व्यक्ती सामील होता. हवालाद्वारे मोठ्या प्रमाणावर पैसे देण्यात आल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत आहे.

ed raid in punjab : ईडीला सापडले १० कोटीचे घबाड, अजूनही कारवाई सुरूच

महत्वाचे लेख