अ‍ॅपशहर

साईंची पूजा केल्यानेच दुष्काळ: शंकराचार्य

द्वारका-शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा साईबाबा आणि साई भक्तांना लक्ष्य केले आहे. पूजेस ‘अपात्र’ असलेल्या साईबाबांची पूजा केल्यानेच महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती उद्भवली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद पुन्हा चर्चेत आले आहेत.

Maharashtra Times 11 Apr 2016, 5:42 pm
मटा ऑनलाइन वृत्त । हरिद्वार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम drought in maharashtra result of sai worship shankaracharya
साईंची पूजा केल्यानेच दुष्काळ: शंकराचार्य

द्वारका-शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा साईबाबा आणि साई भक्तांना लक्ष्य केले आहे. पूजेस ‘अपात्र’ असलेल्या साईबाबांची पूजा केल्यानेच महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती उद्भवली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद पुन्हा चर्चेत आले आहेत.

स्वामी स्वरुपानंद हे हरिद्वार येथे भेट देण्यासाठी आले होते. यावेळी महाराष्ट्रातील दुष्काळावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी साईबाबांच्या पूजेला विरोध केला. पूजेस अपात्र असलेल्यांची पूजा केली जाते तिथे संकटे थडकतात. दुष्काळ, पूर, मृत्यू किंवा भय अशा स्वरुपाची ही संकटे असतात. महाराष्ट्र या सर्व प्रकारच्या संकटांना सामोरे जात आहे, असे स्वामी स्वरुपानंद यांनी सांगितले.

याआधी स्वामी स्वरुपानंद यांनी २०१४ मध्ये साईबाबांची पूजा करण्यास विरोध केला होता. साईबाबा देव नसून त्यांची पूजा करु नये असे फर्मानच त्यांनी काढले होते. तसेच स्वामी स्वरुपानंद यांनी आपल्या भक्तांना साईबाबांचे फोटो आणि मूर्ती मंदिरातून काढण्यास सांगितले होते.

तसेच शनिशिंगणापूर संदर्भात टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शनि ‘पापग्रह’ आहे. त्यामुळे शनिची पूजा केल्यास महिलांच्या विरोधातील गुन्हे वाढतील, बलात्काऱ्यांच्या घटनांमध्येही वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले.

If Shani casts his vision on women, incidents of rape will increase: Swami Swaroopanand Saraswati #RightToPrayhttps://t.co/UhuCd7NNzI — TIMES NOW (@TimesNow) April 11, 2016

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज