अ‍ॅपशहर

e sreedharan : 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन बोलले, 'केरळमध्ये लव्ह जिहाद, विरोध करणार'

मेट्रो मॅन अशी ओळख असलेले ई श्रीधरन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर ते आता केरळच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जाऊ लागले आहेत. त्यांनी लव्ह जिहादबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Feb 2021, 7:02 pm
कोची: दिल्ली मेट्रोपासून ते प्रत्येक शहरात मेट्रो उभारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ई श्रीधरन यांना 'मेट्रो मॅन' म्हणून ( e sreedharan ) ओळखले जाते. ई श्रीधरन यांनी आता भाजप प्रवेश केला आहे आणि अचानक राजकारणात येऊन त्यांनी सर्वांना चकीत केले. श्रीधरन केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बनले आहेत. लव्ह जिहादच्या ( love jihad ) मुद्द्यावरही ते बोललेत. आपण लव्ह जिहादच्या विरोधात आहोत. कारण हिंदू मुलींना फसवले जात आहे, असं ते म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम E Sreedharan
'मेट्रो मॅन' ई श्रीधरन बोलले, 'केरळमध्ये लव्ह जिहाद, विरोध करणार'


केरळमध्ये लव्ह जिहाद सुरू आहे हे आपल्याला माहित आहे. केरळमधील निवडणुकांपूर्वीच्या त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. हे विधान निवडणूक रणनीतीशी जोडले जात आहे.

E Sreedharan : 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांना केरळच्या मुख्यमंत्रीपदाची चाहूल
'केरळमध्ये होतोय लव्ह जिहाद'

"...लव्ह जिहाद, होय, मी केरळमध्ये काय घडतंय ते पाहतोय. लग्नासाठी हिंदूंना कसं फसवलं जातंय आणि ते लव्ह जिहादने कशाप्रकारे पीडित आहेत. फक्त हिंदूच नव्हे तर मुस्लिम, ख्रिश्चन मुलींनाही लग्नासाठी फसवलं जात आहे', असं श्रीधरन म्हणाले. एनडीटीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले.

दिशा रवीला जामीन नाहीच, २३ तारखेला कोर्ट देणार निकाल
'लव्ह जिहादचा विरोध करेन'

'मी लव्ह जिहादला नक्कीच विरोध करेन', असं ते म्हणाले. भाजप शासित राज्यांमध्ये लव्ह जिहादची चर्चा होत असताना त्यांचं हे वक्तव्य आलं आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अनेक राज्यात त्याविरूद्ध कायदे केले गेले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज