अ‍ॅपशहर

earthquake : ​दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले, झज्जरजवळ भूकंपाचे केंद्र

दिल्ली पुन्हा भूकंपाने हादरली आहे. सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र हे हरयाणातील झज्जरमध्ये होते. दिल्लीसह एनसीआरही भूकंपाने हादरले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jul 2021, 12:19 am
नवी दिल्लीः दिल्ली-एनसीआर सोमवारी रात्री भूकंपाने हादरले. या भूकंपाचे केंद्र हे हरयाणातील झज्जरपासून १० किमी उत्तरेत होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.७ इतकी नोंदवली गेली. हा भूकंप १०.३६ वाजता आला. भूकंपाची खोली ५ किलोमीटरवर होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम earthquake
दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले, झज्जरजवळ भूकंपाचे केंद्र


दिल्ली-एनसीआरला सतत भूकंपांचे धक्के

गेल्या महिन्यात २० जूनला राजधानी दिल्लीतील पंजाबी बाग भागात २.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंप आला होता. गेल्या दिल्ली-एनसीआरमध्ये अनेकदा भूकंप झाले. यातील बहुतेक भूकंप हे कमी तीव्रतेचे होते. गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्टदरम्यान दिल्ली-एनसीआरला अनेक भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपांची केंद्र ईशान्य दिल्ली, रोहतक, सोनीपत, बागपत, फरीदाबाद आणि अलवर या ठिकाणी होते.

Earthquake in Leh: लेह-लडाखला पुन्हा एकदा भूकंपाचा झटका
दिल्लीत वजीराबाद, तिमारपूर आणि कमला नेहरू-रिज यासारख्या विविध ठिकाणी अॅक्टिव्ह फॉल्ट दिसून आले.

महत्वाचे लेख